दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही,आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही,यालाच जीवन म्हणतात..शुभ रात्री!
गर्व करून कुठल्याही नात्याला तोडण्यापेक्षा,
माफी मागून ती नाती जपा,
कारण वेळ आल्यावर पैसा नाही तर,
माणसंच साथ देतात…!
शुभ रात्री !
आपली खरी स्वप्न तीच आहेत जी आपल्याला
रात्री उशिरापर्यंत जगण्यास आणि
सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात.
मांजरीच्या कुशीत लपलंय कोण?
इटुकली पिटुकली पिल्ले दोन!
छोटे छोटे डोळे, इवले इवले कान,
पांघरून घेऊन झोपा आता छान.
शुभ रात्री!
पाण्यापेक्षा तहान किती आहे,
याला जास्त किंमत असते..
मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते,
या जगात नाते तर सगळेच जोडतात,
पण नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते…
शुभ रात्री !
आयुष्यात कितीही चांगली कर्म करा,
पण कौतुक हे स्मशानातच होतं…
शुभ रात्री !
जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते,एखादी गोष्ट पूर्वीपेक्षाजास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.
जेव्हा कमवायला लागलो तेव्हा समजले..वडिलांच्या पैशावर चैन करता यायची,स्वतःचा पैशामध्ये तर गरज ही नीट पुर्ण होत नाही…शुभ रात्री !
जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल,
हसा इतके कि आनंद कमी पडेल,
काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे,
पण प्रयत्न इतके करा कि
परमेश्वराला देणे भागच पडेल.