Village Quotes in Marathi | गाव मराठी सुविचार

village quotes in marathi
village quotes in marathi

शहरे कितीही update झाली तरी, गावाकडची मजा काही वेगळीच असते …


माझं गाव

कोल्हापूर जिल्ह्यात, शाहूवाडी तालुक्यात येळवडी हे माझं गाव आहे..
डोंगराळ भागात असल तरी अतिशय सुंदर माझं गाव आहे…

नागमोडी वळणे आणि हिरवीगार झाडी आहे..
आंबे आणि फणस यांनी सम्रुध माझं गाव आहे…

मातीच्या भिंती असल्या तरी मजबूत त्यांचे खांब आहेत..
खापऱ्यांची घर असल तरी दिसायला शोभणीय आहेत..

शहरांपेक्षा सुंदर तर माझं गाव आहे..
कारण इथे घर खोली नंबर ने नाही तर वडिलांच्या नावाने ओळखल जात…

गावाकडचा पावसाळा मन भरून पाहावासा वाटतो..
हिवाळ्यात मात्र चुल आणि शेकोटीच हवीशी वाटते..

फ्रिजच्या पाण्यापेक्षा कधीतरी छोट्याश्या झऱ्याच पाणी पिउन पहावे…
गावी आल्यावर सावकरापेक्षा कधी तरी शेतकरी होऊन पहावे..

_ नेहा पाटील


नेहमी संथ मंद वाहणारी पंचगंगा , आज थोडी लगबगीत च भासत होती ,
जणू आपल्या प्रवाहाच्या लयीतून
काहीतरी सांगू पाहत होती ,
तिच्याकडे पाहून आपसूक जाणवलं आज ,
गड्या, आपल गाव तेवढं सुटलं आता …!

दररोज शाळेसमोरची झाड झुडप ,
खुल्या दिलाने स्वागत करायची ,
पण आज का कोणास ठाऊक ,
मी पुढे येऊ लागताच
आज ती सुद्धा पाठमोरी धाऊ लागली ,,,
त्या मागे सरकत्या चिंचेकडे आणि पाठमोऱ्या आमराई कडे पाहून कळून चुकलं पुन्हा एकदा ,
गड्या आपलं गाव तेवढं सुटलं आज ….!

पायाखालची जमीन देखील आज वाळू सारखी निसटत होती ,
जिने आयुष्यभर जगवल वाढवलं ,
ती माती देखील आज थारा देत नव्हती ,
हे पाहून तर चांगलंच जाणवून गेलं ,
गड्या आपलं गाव तेवढं सुटलं आता ….!

हा पुण्याला शिकतो , तो मुंबईला राहतो ,
रोज पारावर असायच्या आमच्या चर्चा ….,
आज माझच मन मला समजावू लागलं ,
कशाला हव्यात जगाच्या बाता …?
गड्या आपलं ही गाव सुटलं च की आता …!
गड्या आपलं ही गाव सुटलं च की आता …!

-सूरज शांतीनाथ गिरमल


ओढ गावची
दूर देशी माझा गाव
साद घाली माझ्या मना
थेंब पावसाचा उतरे
चिंब भिजवी माझ्या मना
हिरवं पसरले रान
ढगात भरले कोणी प्राण
सजली,नटली ही धरनी
नवरी दिसे किती छान
नभी आवाज गुंजला
गडगड करुनी तो आला
पावसाच्या चाहुलीने
राजा शेतकरी सुखावला.
घर राहिले माझे दूर
दिस आठवणीत संपला
भास मातीचा का होई
जीव गावात रेंगाळला

-Yogesh Dhondu Ghadi


गावाची ओढ
बंद झाल्या साऱ्या वाटा
बंद सारी खिडक्या दारे
बंद सारी नाती गोती
बंद मनाची कवाडे.

मन मरून गेलया
ओढ गावची केवढी
गावी नाही आता थारा
दूर राहिली माझी वाडी.

गाव माझा ,मीच पाहुणा
केवढे दुःख माझ्या मनी
बघतो वळून वळून
माय डोळे दारात लावूनी.

पोटा पाई झालो परका
पाठ केली गावाकडे
आठवणींचे किनारे
राहिले कसे मागे सारे.

गोड मानून खाईन मीठ भाकरी
करीन डोंगराची चाकरी
आयुष्याची संध्याकाळ
घालवेन गावाच्या पारावरी.

कधी सुटेल हे कोडं
घेईन तुझी गळा भेट
येऊन तुझ्या पायापाशी
विसरेन शहराची वाट.

– योगी


दूर माझे गाव होते

डोंगराची रांग होती, पाखरांचे गाण होते, त्या तिथे पलिकडे हो, दूर गाझे गाव होते..
नागगोडी वाट होती, सोबतीला भव्य वाडे.. कोपन्याला त्या नदीच्या, विखुरलेले कैक पाडे..
तो वडाचा पार होता, एक अन् देऊळ होते, त्या तिथे पलिकडे हो, दूर गाझे गाव होते…
गावची हो शान होती, आगुची ती प्रिय शाळा…
चिंच, गोट्या, आगराई, दर सुटीचा ठोकताळा.. ती नदीपण माय होती, शेत-वावर बाप होते…. त्या तिथे पलिकडे हो, दूर गाझे गाव होते….
शांत आता गाव झाले, क्षुन्ध अन् उदास झाले, त्या दुष्काळाने सदाच्या, तोरणे गळफास झाले..
शेत झाले चाळवदे, जे कभी कसदार होते.. त्या तिथे मलिकडे हो, दूर माझे गाव होते.
— कुशल असावा

5 thoughts on “Village Quotes in Marathi | गाव मराठी सुविचार”

  1. शहरे कितीही update झाली तरी, गावाकडची मजा काही वेगळीच असते …

    [माझं गाव]

    अहमदनगर जिल्ह्यात, अकोले तालुक्यात हरिश्चंद्र गडाच्या पायथ्याशी गंभिरवाडी हे माझं गाव आहे..
    डोंगराळ भागात असल तरी अतिशय सुंदर माझं गाव आहे…

    नागमोडी वळणे आणि हिरवीगार झाडी आहे..
    आदिवासी आणि डांगाणी नावाने सम्रुध असे माझं गाव आहे…

    मातीच्या भिंती असल्या तरी मजबूत त्यांचे खांब आहेत..
    कौलारू घरं असली तरी दिसायला शोभणीय आहेत..

    शहरांपेक्षा सुंदर तर माझं गाव आहे..
    कारण इथे घर खोली नंबर ने नाही तर वडिलांच्या नावाने ओळखल जात…

    गावाकडचा पावसाळा मन भरून पाहावासा वाटतो..
    हिवाळ्यात मात्र चुल आणि शेकोटीच हवीशी वाटते..

    फ्रिजच्या पाण्यापेक्षा कधीतरी छोट्याश्या झऱ्याच पाणी पिउन पहावे…
    गावी आल्यावर शहर वाल्यापेक्षा कधी तरी शेतकरी होऊन पहावे..
    (नितेश गंभिरे.)

    Reply
  2. माझं गाव

    कोल्हापूर जिल्ह्यात, भुदरगड तालुक्यात मोरस्करवाडी हे माझं गाव आहे..
    डोंगराळ भागात असल तरी अतिशय सुंदर माझं गाव आहे…

    नागमोडी वळणे आणि हिरवीगार झाडी आहे..
    आंबे आणि फणस यांनी सम्रुध माझं गाव आहे…

    मातीच्या भिंती असल्या तरी मजबूत त्यांचे खांब आहेत..
    खापऱ्यांची घर असल तरी दिसायला शोभणीय आहेत..

    शहरांपेक्षा सुंदर तर माझं गाव आहे..
    कारण इथे घर खोली नंबर ने नाही तर वडिलांच्या नावाने ओळखल जात…

    गावाकडचा पावसाळा मन भरून पाहावासा वाटतो..
    हिवाळ्यात मात्र चुल आणि शेकोटीच हवीशी वाटते..

    फ्रिजच्या पाण्यापेक्षा कधीतरी छोट्याश्या झऱ्याच पाणी पिउन पहावे…
    गावी आल्यावर सावकरापेक्षा कधी तरी शेतकरी होऊन पहावे..

    _

    Reply
  3. ✨💗Gav❕
    Maje gav Karad Hya bhagamadhe matekarwadi he aahe… ✨
    … Aaple gav Hech jivan..🌍
    …aapn Kamasatti Baher shahri jato, Kadhi vichar tri karun paha aaplya tya gavach…
    Ky mahnet asel te Aapn baher ramu shakto pn tya gavala karmat nhi… ☹️
    Hech tr gav ast! 😚
    Love you village.. 🌍✨💗

    Reply

Leave a Comment