तुम्हाला माहीतच असेल की आताच्या परिस्थितीमध्ये ऑक्सिजन सिलिंडर चा खूप तुटवडा भासत आहे ,लोकांना एक ऑक्सिजन सिलिंडर मिळवण्यसाठी कितीही पैसे देण्यासाठी तयार आहेत , ४ ते ५ हजारचा सिलिंडर लोक ४० ते ५० हजार सुद्धा देत आहेत .म्हणून आज या ब्लॉग मध्ये तुम्हाला ऑक्सिजन कसं बनवलं जात ,त्याची पूर्ण प्रक्रिया काय आहे ह्या बद्दल सांगणार आहे .
ऑक्सिजन बनविण्याची प्रक्रिया
१) हवा वेगळी करण्याची प्रक्रिया
ऑक्सिजन हा आपल्या वातावरणातूनच बनवला जातो .पृथ्वीच्या वातावरणात ७८% नायट्रोजन ,२८ % ऑक्सिजन ,१% आर्गन आणि बाकी सगळे वायु मिक्स असतात .
तर सर्वात पहिले हवेला एका फिल्टर मधून पास केले जाते ,ज्यामुळे होत अस की त्यातील हवेमध्ये असलेली धूळ, घन कण,आणि परागकण त्यातून बाहेर काढले जातात आणि जी उरते ती फक्त गॅस पुढील प्रक्रिये साठी पाठवली जाते .
2) कॉम्प्रेशन आणि थंड करण्याची प्रक्रिया
नंतर त्या गॅस वर उच्च दबाव टाकून त्याला संकुचित(compressed ) केले जाते आणि त्या हवेला शुध्दीकरण युनिट (purification unit) मध्ये टाकलं जात .त्या यूनिट मध्ये पाण्यातील , कार्बन डाय ऑक्साइड मधील (carbon-di-oxide) आणि हायड्रोकार्बन मधील (hydrocarbon) रेणु (molecules) काढले जातात यामुळे होत अस की पुढील थंड करण्याचा प्रक्रिये मध्ये गॅस च रूपांतर बर्फ किवा कोरडे बर्फ (dry ice) मध्ये होत नाही .
तर आता जे उरलेले गॅसेस आहेत त्यांना द्रव्याच्या रूपात (liquid form ) आणण्यासाठी त्यांना -173’C असलेल्या एका कोल्ड बॉक्स मध्ये टाकले जाते, त्यात त्याच रूपांतर (द्र्व्य आणि गॅस)मध्ये होतो आणि त्याला पुढील प्रक्रिये साठी पाठवली जाते .
3) वेगळं करण्याची प्रक्रिया (fractional distillation process)
त्यांतर त्या द्र्व्याला आणि बाकीचे गॅसेस ला वेगळ करण्यासाठी त्याला एका टॅंक मधून पाठविले जाते ,तुम्हाला माहीतच असेल की सगळ्या गॅसेस ची घनता(density) वेग वेगळी असते ,ऑक्सिजन ची घनता जास्त असल्यामुळे ते खाली साठले जातता ,आणि नायट्रोजन आणि आर्गन ची घनता कमी असल्यामुळे ते टॅंकच्या वरच्या भागातून बाहेर सोडले जातात .आणि त्यांनातर आपल्या भेटतो ते ( द्रव्य आणि गॅस ) (liquid oxygen) .
आणि हे ऑक्सिजन पुढे ऑक्सिजन सिलिंडर मध्ये भरले जाते आणि हॉस्पिटल मध्ये पाठविले जाते .हे पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसे वाटले कोममेंट्स मध्ये कळवा .
ही पूर्ण प्रक्रिया विडियो च्या रूपता बघ इथे :-