Motivational Quotes in Marathi म्हणजे चार गोष्टी चांगल्या सांगितल्या म्हणून कोणी motivate होत नसतो, त्यात सत्यता आणि खरेपणा पण असावा लागतो आणि माझ्या एवढया सगळ्या प्रयत्नांचा तेव्हाच फायदा होईल जेव्हा तुम्ही त्याच आपल्या खऱ्या आयुष्यात वापर कराल. म्हणून हाच motivational quotes in marathi तुमच्यासाठी घेऊन आलो आहे आहे कारण जगातील प्रत्येक व्यक्तीला मोटिवेशन ची गरज लागते मग तो लहान असो किवा मोठा, मग ते मोटिवेशन अभ्यासातिल असो किवा आयुष्यातील, कारण हेच मोटिवेशन त्याना नवीन काहीतरी करण्याची संधि देत. जर तुम्ही हा पूर्ण मोटिवेशनल कोट्स इन मराठी ब्लॉग वाचलात तर तुम्ही आयुष्यात नक्कीच काहीतरी चांगलं कराल.
म्हणून आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत motivational quotes in marathi ब्लॉग जे मी स्वतः लिहिले आहे, हेच मोटिवेशनल कोट्स तुम्हाला तुमच्या ध्येया पर्यंत पोहोचवतील जेणेकरून तुम्हाला ते वाचयला मिळतील आणि तुम्हाला त्यातून काहीतरी शिकायला मिळेल, पूर्ण ब्लॉग वाचा आणि कसं वाटला खाली कमेन्ट मध्ये कळवा,धन्यवाद.
Motivational Quotes in Marathi
१. “सगळं संपलं अस कधीच होत नाही life मध्ये ,ती वेळ तशी असते म्हणून आपल्याला वाटत असतं ,अस जर सगळेच बोलले असते तर ते पुढे गेलेच नसते तिथेच सगळं सोडून हार मानली असती ,जेवढे मोठे स्वप्न तेवढं कठीण प्रवास असेल ..🔥”
२. “तुम्हाला life मध्ये कोणासोबत तुलना करायची असेल ना तर त्यांच्यासोबत करा जे त्या क्षेत्रात सर्वात टॉप ला आहेत कारण जेव्हा आपण तस करू ना तेव्हा आपण त्यांना follow करायला लागू त्यांची विचारसरणी आपल्याला कळत जाईल आणि हळू हळू आपल्याला समजेल की आपण पण पुढे चाललो आहोत आपल्या स्वप्नांजवल ..”
३. ” तुम्हाला life मध्ये नक्की काय करायचं ते ठरवा आधी ,फक्त बाकीचे ते करत आहेत म्हणून त्याच्या मागे धावू नका ,स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा आणि जे काही ककरत असाल त्यात प्रामाणिक रहा स्वतशी ,तेव्हा कुठे तुम्ही एक पाऊल जवळ जाल आपल्या स्व्पानांच्या…”
४. “फरक पडतो जेव्हा तुमच्यासोबत गरजेला कोणी नसतं ,फरक पडतो जेव्हा life मध्ये तुम्ही एकटे पडता ,फरक पडतो जेव्हा तुम्ही सगळ्या problems ला एकटे face करता ,पण यामुळे चांगली गोष्ट ही होईल की जेव्हा तुम्ही या सगळ्यातून एकटे बाहेर पडाल ना तेव्हा तुम्हाला हारावणार कोणी नसेल इथे ,तुमच्याएवढं strong इथे कोणी नसेल हे लक्षात ठेवा ..”
५. “काल जे काही झालं असेल ते past होत ,आज नवीन संधी आहे ,नवीन दिवस आहे ,कामाला लागा ,कारण आपल्याला फक्त धावायचं नाही आहे ,शर्यत जिंकायची आहे ❤️”
६. “अरे यार ,तुम्ही आहात तसेच जाम भारी दिसता उगाच स्वताला दुसर्यांसोबत compare करू नका तुमची बरोबरी कोणी नाही करू शकत ..”
“Motivation बघणं, वाचणं सगळं ठीक आहे यार, पण ते फक्त काही वेळासाठी राहतं, जिथपर्यंत तुम्ही काही करत नाही ना तिथपर्यंत सगळं व्यर्थ आहे, हे जेवढ्या लवकर तुम्हाला कळेल तेवढं चांगलं आहे..
” हा प्रत्येकाचा आयुष्यात येत असतो, कधी तो लवकर येतो कधी तो उशिरा येतो पण तो येतोच म्हणून त्याला सामोरं जाईला तयार रहा,
कारण तेव्हा तो फक्त तुमच्या आयुष्यात येणार आहे आणि त्यावर मातही तुम्हालाच करायची आहे, गोष्टी भिघडतील, नाती तुटतील पण स्वताला सावरून तुम्हलाच यातून बाहेर पडायचं आहे..
हे पण वाचा ⇓⇓
तेव्हा काय करायचं ? (ही पोस्ट शेवट पर्यंत वाचा )
जेव्हा आपल्या आयुष्यात सगळ्या चुकीच्या गोष्टी घडत असतात ,
जेव्हा तुम्हाला जाणीव होते तुम्ही पूर्णपणे एकटे पडले आहात ,
जेव्हा life मध्ये पुढे आपल्याला काय करायचं हे आपल्याला सुचत नाही ,
जेव्हा खूप दुःख असतात ,problems असतात तरी आपल्याला ते कोणाला सांगता नाही येत ,
जेव्हा वाटतं की आता सगळं संपलं ,आता मी हारलो ,आता मला नाही जमणार ,मी थकलो …
जेव्हा अचानक आपल्याला जवळची लोक आपल्याला पासून लांब जातात ज्याची आपण कधी अपेक्षा सुद्धा केली नसते ,
जेवहा वाटतं की कंटाळा आलाय या आयुष्याच्या ,सगळ्या गोष्टी विरुद्ध होत आहे ,
कस असतं ना प्रत्येक जण या phase मधून जातो एकदा तरी कारण तो आपल्या life चा एक भागच आहे यार ,तुम्हाला कुठलीच गोष्ट सहज नाही मिळणार ,तुम्हाला पाहिजे तस नाही होणार कारण life ने तुमच्यासाठी काहीतरी वेगळं ठरवून ठेवलं असेल ,
म्हणून काहीही झालं तरी धीर नाही सोडायचा रे ,आज दिवस वाईट आहे ,उद्याचा अजून वाईट पण पर्वा चा दिवस चांगला असेल हे लक्षात ठेव कारण गोष्टी चुकीच्या घडत असतात कारण त्यांना तुम्हाला काहीतरी शिकवायचं असतं ,सांगायचं असतं ,तुमचे patience बघायचे असतात ,तुम्हाला त्या सगळ्यांवर मात करायची आहे हे लक्षात घ्या ..
अस धीर सोडू नका यार ,आणि सर्वात पहिले negative विचार आणू नका की अस नाही झालं तर ,मला हे नाही जमलं तर ,जर तर च विचार करून काही होणार आहे ,उलट अस विचार करा मी अजून काय करू शकतो ज्याने माझे जिंकण्याचे chances अजून वाढतील ,
चांगल्या गोष्टी घडायच्या आधी वाईट गोष्टी घडतातच फक्त तेच दिवस असतात जेव्ह तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे आणि सांगायचं आहे की ‘ चल ठीक आहे माझा आजचा दिवस वाईट गेला म्हणून काय झालं ,मला माहित आहे मी नक्की यशस्वी होणार आहे ,आज नाही जमलं उद्या नक्की जमेल ,तुम्हाला स्वतःलाच motivate करायचं आहे कारण कोणी येणार आहे , की तू अस कर किंवा तस कर ,जे काही आहे त्यांना तुम्हा एकट्यालाच सामोर जायचं आहे …
मला माहीत आहे तुम्ही या सगळया गोष्टीमधून खूप लवकरच बाहेर पडाल ,मला खात्री आहे कारण मला माहित आहे तुम्ही strong आहात ,तुम्ही अशे लगेच हार नाही मानणार ,मला विश्वास आहे की तुम्ही एक दिवस नक्की यशस्वी होणार आहात ,फक्त त्यासाठी आता थोड्या वाईट ,अवघड दिवसांना सामोर जावं लागत आहे ,हीच ती वेळ असते जेव्हा एकतर लोक हार मानतात किंवा ह्या सगळ्या गोष्टींना सामोर जातात हाच छोटासा फरक असतो यशस्वी आणि अयशस्वी लोकांमध्ये ….
तुम्हाला life मध्ये खूप लोक भेटतील जे तुम्हाला ह्या परिस्तिथी मध्ये अजून negative गोष्टी सांगतील की सोडून दे ,नको याच्या मागे लागूस ,काही होणार नाही ,आपलं काहीतरी काम शोध ,या सगळ्या गोष्टीत काही नाही आहे ,उगाच वेळ घालवू नकोस ,
ते तुमच्यावर आहे की तुम्हाला त्याचं किती ऐकायचं आहे ते ,कारण ही तीच लोक असतील जी तुम्ही यशस्वी झाल्यावर तुम्हाला शुभेच्छा देईला येतील ,फोटो काढायला येतील कारण वेळेसोबत सगळं बदलतं तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला नक्की काय करायचं आहे ,कुठे जायचं आहे ..
एक गोष्ट लक्षात ठेवा वाईट वेळेत कोणी नसतं आणि कोणाकडून अपेक्षा पण ठेऊ नका ,कारण हे तुमचं आयुष्य आहे तुम्हाला सामोर जायचं आहे मग ती कुठलीही गोष्ट असुद्या ,जे काही सुख दुःख असतील त्या सोबत जगायचं आहे ..
निर्णय तुमचा आहे की तुम्हाला हार मानायची आहे आज का उद्यापासून परत नवीन ऊर्जा ,नवीन प्रेरणा घेऊन सुरवात करायची आहे ,ही वेळ ,हे क्षण एकदा निघून गेले का परत नाही मिळणार ,दुःख असेल ,problems असतील ,tension असतील तरी फक्त हा विचार करा की हे फक्त काही वेळेसाठी आहे ,ही वेळ ही निघून जाईल आणि होईल सगळं ठीक ..❤️😊
हा ब्लॉग share करा त्या प्रत्येक मित्र- मैत्रिणी सोबत जे ह्या phase मधून जात आहेत ,त्यांना नक्कीच थोडा आधार आणि प्रेरणा मिळेल ❤️,
पोस्ट आवडली असेल तर खाली comments मध्ये कळवा ❤️😊
७. “मला संधी भेटेल तेव्हा मी ते करीन त्यापेक्षा मला संधी कशी भेटेल याच विचार करा मार्ग आपोआप सुचतात …”
८. “हा तुम्हीच, बस झालं आता खूप झालं त्यांच्यासाठी रडत बसणं , त्यांची वाट बघणं ,स्वतःला त्रास करून घेणं ,त्यांना खरच जर तुमची एवढी काळजी असती ना तर त्यांनी विचारपूस तरी केली असती ,खऱ्या आयुष्यात या आता ,Reality ला सामोर जा ,जेवढं दिसतं तेवढं सगळं सोपं नसणार आहे ,तुम्हाला अजून strong होईच आहे आतून ,स्वतःला खंबीर बनवायचं आहे ,फक्त जर तुम्ही ठरवलत तर ..”
९. “आळस आहेना तूच तुमचं नुकसान करणार आहे ,Problem उशिरा उठण्याचा नाही आहे यार problems आहे त्या सवयीचा ,
4 min उशिरा उठल्यावर काही होणार नाही आहे पण ती सवय एकदा लागली का परत जात नाही फरक ओळखायला शिका ,स्वप्न तुमचे आहेत ,निर्णय तुम्हाला घेयचे आहेत …”
१०. “तुला तुझे स्वप्न पूर्ण करायचे आहेत तुला काही कठोर निर्णय घ्यावे लागते लोकांच्या भरवश्यावर राहू नका सगळे busy आहेत ,लोकांकडून अपेक्षा करणं बंद करा कारण कोणी इथे तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी नाही आला आहे ,लोक मोठी अशीच होत नाही त्याग ,दुःख सहन कराव लागतं ,तुम्ही तयार आहात ना ?”
प्रेरणादायी विचार मराठी मध्ये
११.”Problems कधीच संपणार नाही आहेत life मधले ,त्यासोबतच जगणं शिकून घ्या ,दुःख येतील ,संकट येतील ,वाईट परिस्तिथी येईल हे सगळं तुमच्या हातात नसेल पण तुम्ही या सगळ्यांना कस सामोर जाता हे तुमच्या हातात आहे.”
१२. “अशे खूप लोक भेटतील तुम्हाला जे विनाकारण तुमचा तिरस्कार करतील ,तुम्हाला कमी लेखातील ,तुम्हाला वेडे समजतील ,समजुद्या काही फरक पडत नाही ते बोलल्याने तुम्ही मोठे किंवा छोटे होत नाही ,आणि तुम्हाला माहीत आहे ना तुम्ही कसे आहात ते मग बस झाल ,ignore करायचं ते आपोआप शांत होतील …”
हे पण वाचा 👇👇
1. Inspirational Marathi Quotes
2. 100+ Best Life Quotes in Marathi
पाहली गोष्ट लोकांचं ऐकणं बंद करा ,कोणी काहीही बोलण्याने तुमच्या life मध्ये काही फरक नाही पडणार आहे ,म्हणून तो विचार पहिल्यांदा काढून टाका आणि तुम्हाला काय वाटतं आहे ते महत्वाचं आहे .
Reality Accept करायला शिका ,जे काही चुकीच ,वाईट झाला असेल ते मान्य करा जरी ते तुम्हाला पटत नसलं तरी ,काही गोष्टी आपल्याला नाही आवडणार पण ते खरं असतं त्याला ignore करून काही होणार नाही आहे ,
सोपं नसेल पण खरं नेहमी खरच रहात तुम्हाला आवडो किव्हा नाही .
तुमचा Mindset ,हे सगळे बदल आणायचे असतील तर त्याआधी तुम्हाला ,तुमचे विचार ,दृष्टीकोन बदलावे लागतील ,यावर्षी जे झाल ते झालं पण आता तुम्हाला एक free mindset ठेऊन जगायला सुरवात करा ,
Positive videos बघा ,तश्या लोकांना भेटा त्याच्याशी बोला याने तुम्हाला समजत की ते कशे विचार करतात ते ..
मेहनत घ्या,यावर्षी जमलं नाही जमलं ,जाऊदे पण आता फक्त बोलून आणि विचार करून नाही चालणार , practically ते करायला घ्या त्याशिवाय काहीच होणार नाही आहे ,चूका होतील ,पडाल चालेल शेवटी काय असतं ना पडल्याशिवाय माणूस शिकत नाही ..
नाती जपा,यावर्षी खूप काही बिघडलं असेल तुमच्या नात्यांमध्ये पण आता ती तुम्हालाच जपायची आहेत, कारण नाती महत्वाची असतात फक्त कामपूरता नाही तर एक support म्हणून ,माणसं कधी बदलत नाही रे त्यांची परिस्तिथी त्यांना तस करायला भाग पडते ,म्हणून नवीन नाती जोड पण जुनी विसरू नका.
Enjoy करा रे,सगळ्यांच्या life मध्ये problems आहेत आणि सगळे ते face करत आहेत पण म्हणून काय तस दुःखी रहाणार आहात का,अरे सोडा यार ,प्रत्येक दिवस आनंदाने जगा ,प्रत्येक क्षण हा महत्वाचा असतो कारण आयुष्य कधी संपेल हे सांगता येत नाही ..❤️
१३. “365 दिवस आहेत ,त्यातील प्रत्येक दिवस आणि क्षण महत्वाचा असणार आहे ,ज्यांना खरच काही करायचं आहे त्यांच्यासाठी हा वर्ष म्हणजे 365 संधी आहेत हे लक्षात ठेवा ,वेळ अजसपासूनच सुरवात होत आहे.”
१४. ” सोपं नसतं रे …Breakup झाल्यावर हसत हसत सगळ्यांसमोर वावरणं ,Failures आल्यावर मी ठीक बोलून एकटं रडत बसणं ,आपल्या लोकांनी दुःख दिल्यावर त्यांना काही न कळता अबोला पकडणं ,लोकांनी ignore केल्यावर काहीच झालं नाही आहे भासवणं ,आपल्या मागे खूप problems असले तरी सगळं एकटं सहन करणं ,हे सगळं सोपं नसलं तरी एक गोष्ट सोपी आहे ती म्हणजे स्वतावर विश्वास ठेवणे आणि सगळ्यांना सामोर जाणं ..”
१५ “नवीन दिवस ,नवीन सकाळ ,नवीन संधी ,मग वाट कसली बघताय कामाला लागा जे ठरवलं आहे ते करायला घ्या जे गेलं ते विसरून जे आहे त्यावर focus करा .”
१६. “जस आज तुमच्या मध्ये नवीन वर्ष सुरू होईल म्हणून जो उत्साह आहे ना तोच उत्साह पुढे 365 दिवस तुमच्यात राहो आणि बाकी काहिनाही रे मस्त खुश रहा ❤️”
१७. “चला यार,जास्त विचार करू नका ,तुमच्या डोक्यात आता खूप विचार चालू असतील की काय करू ,कस होईल ,मला जमेल ना ,सगळं ठीक होईल ना ,तर हे विचार पाहिले काढून टाका कारण सगळं एक no होणार आहे ,तुम्ही सुरवात करा कसलाच विचार न करता आणि कामाला लागा.
Motivational Status in Marathi
१८. “जेव्हा एखादी गोष्ट मनापासून करायची ठरवली ना का त्याला कारणं कधीच अडथळा म्हणून येत नाही ,कारण आपल्याला ती गोष्ट पूर्ण करायची असते काहीही झालं तरी ,म्हणून जे काही करत असाल ते मनापासून करा..”
१९. “तुमच्या life मध्ये आलेली प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असेल ,आपण जसे आहोत तसे तेही असतील अशी अपेक्षा करू नका ,ते जसे आहेत तसे त्यांना accept करा ,लोक तेव्हाच शिकतात जेव्हा 2 वेगळी माणसं एकत्र येतात मग ते स्वभावाने असो किंवा विचाराने ..”
२०. “होईल सगळं ठीक,तुमच्या life मध्ये जे problems आहेत ते फक्त काही वेळेसाठी असतात ,थोडं वेळ लागतो पण त्याच उत्तर मिळेल तुम्हाला ,ज्यांनी तुम्हाला फसवलं त्यांना पण शिक्षा भेटते तुम्ही काही करू नका कारण तुम्ही आणि ते वेगळे आहात ,Tension घेणं सोडा रे ,आयुष्य अस पटकन डोळ्यासमोरून निघून जात कळत सुद्धा नाही ,जे आहे त्यात आंनदि रहा पैसे कमवा ,खूप कमवा पण जे काही आहे ते स्वतःच्या जीवावर कमवा आणि फक्त कोणाला फसवून नको ,ते टिकतपण नाही ,मागचा वर्ष संपला आहे जे काही असेल ते मागेच ठेऊन पुढे चला ..”
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
खुप खुप छान 👌👌👌👌
Thank-you 😊
You r really doing v.v.great work.
Give Motivation to others who r lost their hopes from life…. is kind of worship….thanks for your thoughts …
Hello, your motivational blog is so great. I live in Toronto, Canada. I am at the lowest point in my life right now at age 71. I came across your motivational quote, तेव्हा काय करायच??
As I started reading this, I felt that it is written just for me! It made so much of sense. I needed someone to snap me out of my depressed feelings. Your article made me think. I thank you from bottom of my heart for that.
Hopefully I will be able to resolve things, आणि होईल सगळ ठीक.
Keep up the good work 👏
Most Welcome and thank-you For This msg ,it keeps me motivated to write more and more ❤️😊