मराठी प्रेरणादायी भाषण(लेख) | Motivational Speech in Marathi

आयुष्यात काहीही प्राप्त करण्यासाठी आंतरिक प्रेरणा आणि जिद्दीची आवश्यकता असते. जो व्यक्ती आपल्या पूर्ण शक्तिनिशी एखाद्या गोष्टीला प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करतो यश याच्या पायाशी लोटांगण घातल्या शिवाय राहत नाही. आपल्या समाजात असे अनेक लोक आहेत ज्यांनी संपूर्ण समर्पण आणि जिद्दीद्वारे अनेक गोष्टी प्राप्त केल्या आहेत.

आजच्या या लेखात आम्ही आपल्यासाठी काही यशस्वी लोकांचे प्रेरणादायी भाषण मराठी (motivational speech in marathi) घेऊन आलेलो आहोत. यामध्ये जोश टॉक मराठी – josh talks marathi चे देखील काही प्रेरक विडियो समाविष्ट करण्यात आलेले आहेत

तुम्ही कोणासाठी रडत आहात अजून ?

marathi motivational lekh
marathi motivational lekh

त्या व्यक्तीसाठी जे आता खूप खुश आहेत त्यांच्या life मध्ये ,
त्या व्यक्तीसाठी ज्याचं नात फक्त onside होत ,

त्या व्यक्तीसाठी ज्यांना तुमच्याबद्दल काही feelings नव्हत्या ,
त्या व्यक्तीसाठी ज्यांनी तुम्हाला खूप hurt आणि दुःख दिले आहेत ,

त्या व्यक्तीसाठी जे नेहमी तुम्हाला ignore करत आले ,
त्या व्यक्तीसाठी ज्यांच्यामध्ये तुमच्याबद्दल काही respect नव्हतं ,
त्या व्यक्तीसाठी ज्याचं आता लग्न होऊन ते खुश आहेत ,

मला माहित आहे हे सगळं बोलणं सोपं असत पण यार तुम्हाला यावर मार्ग काढावा लागेल ,उपाय शोधावा लागेल ,ते गेले त्यांचं लग्न झालं ,तुमचं काय ,तुम्ही काय देवदास बनून रहाणार आहात का आयुष्यभर ,स्वतःचा विचार करा ,

इथे कोणी कोणाचं नसतं तुमचं भविष्य तुमच्या हातात आहे ,तुम्ही जशी त्याला वाट दाखवालं तस ते तुम्हाला घेऊन जाईल 🔥
आपल्या आई – वडिलांचा विचार करा की त्यांना किती त्रास होत असेल तुम्हाला अस depression मध्ये गेलेलं बघून ,

त्यांच्या मनाला किती वेदना होत असतील ,यासाठी तुम्हाला एवढं मोठं केलं का ,Life मध्ये सगळं करा पण आपल्या आई – वडिलांना त्रास होईल असं काही करू नका 😢

आणि काही गोष्टी घडतात ते तुमच्या चांगल्या साठीच असतात पण ते तुम्हाला आता नाही समजणार ,

आणि तुम्हाला खरच वाटतं की जे तुमच्यासोबत साधं relationship नाही टिकू शकले ते तुमच्यासोबत आयुष्यभराची साथ टिकवेली असती 💔

कधी कधी कस असतं ना आपल्याला जी गोष्ट आवडते ती आपल्यासाठी चांगली नसते पण फक्त आपल्याला आवडते म्हणून ती आपल्याला पाहिजे असते हेच कारण असतं मग नात तुटण्याचं 😞

Life मध्ये सगळ्याच गोष्टी आपल्याला पाहिजे तश्या नाही होणार आहेत म्हणून ते accept करून पुढे जायचं असतं आणि मस्त आयुष्य enjoy करायचं असतं ..❤️😊


जेव्हा लोक ignore करतात

marathi-motivational-lekh
marathi-motivational-lekh

तेव्हा काय करायचं आशे खूप जण विचारत असतात, खर तर त्याच उत्तर प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळं आहे कारण त्याची कारणं पण वेगवेगळी असतात ,

जेव्हा लोक तुम्हाला ignore करतील तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा की जर ते विनाकारण ignore करत असतील तर एवढं लक्ष देऊ नका ,गेले उडत ,

पण जर काही कारण असेल आणि ते तुम्हाला माहीत असेल तर त्या व्यक्तीची एकदा शेवटच बोला आणि नवीन सुरवात करा किंवा कायमसाठी विषय संपवून टाका …

यार आपल्याला काय आयुष्यभर ते ignore करतात हेच धरून बसायच आहे का रे ,

कुठल्या दुनियेत जगत आहोत यार आपण ,आता या सगळ्या दुनियेतून बाहेर यार ,कोणाला काही फरक पडत नाही तुम्ही काय करत आहात त्याच्याशी ,केलं तर केलं ignore ,काय एवढं त्यात ,काहीजन गरज संपल्यावर ignore करतील मग काय त्यांना खुश करण्यात आपली वेळ फुकट घालवायची का ?,

आपण इथे सगळ्यांना खुश करायला नाही आलो आहोत आणि काही चुकी केली नसेल तर का त्या गोष्टीत आपली वेळ वाया घालवायची …

प्रेम आहे वगैरे सगळं मान्य आहे पण यार काहीतरी solution काढावं लागेल ना ,एकतर बोलून मोकळे व्हा नाहीतर मग परत कधीच बोलू नका ,

दोनच पर्याय आहेत यार आणि आपण काहीच करत नाही तेच धरून बसतो आणि त्यांच्यामागे आपली आयुष्य फुकट घालवतो ..

बस एवढंच राहिलं आहे का रे आपल्या आयुष्यात ,मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की बस झाल आता ,स्वतःला बदला ,

एक निर्णय घ्या ,थोडं त्रास होईल ,वेदना होतील ,चालतील पण ते एकदाच होतील पण ते बर आहे हे रोजच दुःख होण्यापेक्षा …👍


motivational speech in marathi

marathi motivational stories
marathi motivational stories

हा तुम्हीच जे लोकांच्या विचार करून स्वतःला त्रास करून घेत आहात ना ,आता बस झालं,कोणी नसत कोणाचं ,काही निर्णय स्वतः घेईला शिका ,अपेक्षा ठेवणं बंद करा ,खूप झालं आता ,

आपलं आयुष्य आहे problems येतील face करा ,दुःख येतील ,तुम्ही एकटे खंबीर आहात ,सगळ्यांना सामोर जाईला ,

बस झाल आता त्यांच्यासाठी झुरण बंद करा ज्यांनी तुम्हाला कधी आंनद दिला नाही , कारण तत्यांच्यासाठी तुम्ही फक्त एक timepass होता हे डोक्यात घुसवा ,

अस I love u बोलून कोणी आपलं होत नसतं हे तुम्हाला लवकर समजलं तर बरं आहे ,

बस झालं आता स्वतःला कोसत बसणं ,तुम्ही हुशार आहात ,काही गोष्टी आपल्याला जमत नाही ,म्हणून तुम्ही ढ वगैरे होत नसता ,लोकांच म्हणणं मनावर घेऊ नका ,

जे नाही जमत शिकून घ्या ,वेळ लागला तरी चालेल पण परत कोणाला बोलायला जागा देऊ नका ….

बस झालं आता ,मस्त आयुष्य जगा ,जे ठरवलं आहे त्याकडे लक्ष द्या ,हे काय करतात ,ते काय करतात ते आता सोडून द्या ,
कोणाला काही फरक पडत नाही तुम्ही काय करत आहात त्याच्याशी तुमच्या आई-वडिलांना सोडून …

कधीतरी यातून बाहेर पडायचंच आहे मग आताच पडा, कधीतरी दुःखांचे डोंगर कोसळणारच आहेत मग आजच कोसळूदे ,

चला आता नवीन सुरवात करायची आहे ,उद्याचा सुर्यात नवीन धेय घेऊन उठायचं आहे ,
आणि नव्हतं जमत ते पूर्ण करायचं आहे ..😊


हे पण वाचा⇓⇓

1) 70+ बेस्ट प्रेरणादायी सुविचार 🔥

2)50+ Inspirational Quotes In Marathi


त्यांनी काय करायचं ?? | मराठी प्रेरणादायी लेख

marathi motivational stories
marathi motivational stories

ज्यांच्या आयुष्यात काहीच चांगलं होत नसेल ,
जे खूप एकटे पडले आहेत ,ज्यांच्यासोबत आता कोणी नाही आहे ,

जे आधीच tension मध्ये आहेत आणि social media त्यांना अजून त्रास देत आहेत ,
ज्यांनी आता कुठे जगायला सुरवात केली आहे आणि हे कोरोना च संकट समोर उभ आहे ,

ज्यांना खूप वेळ लोकांकडून धोका भेटला आहे आणि आता आतून तुटून गेले आहेत ,
जे फक्त जगायचं आहे म्हणून जगत आहेत ,कसलीच उमेद राहिलेली नाही आहे ,सगळं चुकीच होताना दिसत आहे ,

जे काहीतरी करण्याचं प्रयत्न करत आहेत पण काही सुचत नाही आहे त्यांना नक्की life मध्ये आपल्याला काय करायचं आहे ,

ज्यांची परिस्तिथी खूप वाईट आहे आणि कोरोनामुळे ती अजून खराब होत चालली आहे ,
ज्यांना कशातच interest राहिला नाही आहे आपलं चाललंय म्हणून ढकलत आहेत आयुष्याला ,

त्यांनी फक्त एकच गोष्ट करा की स्वतावर विश्वास ठेवा ,जे झालं इथपर्यंत ते झालं पण आता ,नवीन विचार डोक्यात आणावे लागतील ,मार्ग भेटत नसेल तर नवीन मार्ग निर्माण करावा लागेल ,

प्रत्येक गोष्टीचा दोन्ही बाजूने विचार करावा लागेल ,risk घ्यावीच लागेल ,निर्णय बदलावे लागतील ,आपला routine बदलावा लागेल ,स्वतःमध्ये तो विश्वास आणावा लागेल की बाकीचे करू शकतात तर मग मी तर नक्कीच कटू शकतो ,

धडपड करावी लागेल ,आयुष्याला थोड्या वेगळ्या नजरेने बघावं लागेल ,आणि स्वतःच motivation निर्माण करावं लागेल ,तरच काहीतरी बदल घडू शकतो …


जेव्हा लोक दुःख देतात

marathi motivational stories
marathi motivational stories

काय करायचं जेव्हा लोक दुःख देतात काही कारण नसताना ,
काय करायचं जेव्हा लोक धोका देतात आपण चांगलं वागून सुद्धा ,

काय करायचं जेव्हा रोज बोलणारी व्यक्ती अचानक बोलणं बंद करून टाकते ,
काय करायचं जेव्हा आपण ज्यांची respect करतो तेच चुकीचे वागायला लागतात …

काही नाही करायचं यार फक्त धडे घेयचे त्या प्रत्येक व्यक्तीकडून जे आपल्याला दुःख देतात ,तेच धडे आपल्याला खूप कामी येतील भविष्यात हे नेहमी लक्षात ठेवा ,

चल ठीक आहे यार त्या व्यक्तीशी आपण बोलणं बंद करतो ,नात तोडून टाकतो पण त्याने काय होणार आहे ,

अशे अजून खूप लोक भेटणार आहेत तुम्हाला आयुष्यात ,आपल्याला फक्त त्याच्यासोबत कस वागायचं आहे ते शिकायचं आहे आणि त्यांना जश्याच तस उत्तर देयचं जरी तुम्ही खूप साधे असाल तरी कारण ते गरजेचं असतं काही लोकांसाठी …

आणि गेले उडत ते ज्यांनी तुम्हाला धोका दिला ,कारण ज्यांना माणसं नाही परखता येत ते कुठे सुखी असतात यार ,आणि त्यांची पण फसवणूक होते रे कुठेना कुठेतरी ,

आणि ह्या लोकांच tension नाही घेईच ,तुम्हाला देवाने एवढं सूंदर आयुष्य दिल आहे त्यात तुमच्यावर प्रेम करणारे आई-बाबा,मित्र-मैत्रिणी दिले आहेत ,अजून काय पाहिजे तुम्हाला ,
मस्त मजा करा ,शिका,लग्न तर होणारच आहे ना ,

सगळ्यांना आयुष्यात एकदा तरी प्रेम होतं पण ते टिकलं तर ठीक आहे जर नाही तर सोडून द्या ना विषय ,
आयुष्यात खूप काही आहे रे करण्यासारखं ,फक्त कुठे थांबायचं नाही ,सगळ्या गोष्टींचा सामना करायचा ,

जे होणार असतं ते होतच पण आपल्याला आयुष्य कस जगायचं आहे ते आपल्यावर असतं ,ते तुम्हीच असता जे सगळं विसरून एक नवीन सुरवात करतात ,

ते तुम्हीच असता जे स्वतःला motivate करून जगण्याची आशा निर्माण करता ,
ते तुम्हीच असता जे एक निर्णय घेता की मी हार नाही मानणार आयुष्यात काहीही झालं तरी …

1 thought on “मराठी प्रेरणादायी भाषण(लेख) | Motivational Speech in Marathi”

Leave a Comment