घरगुती गणेशोत्सव किमान दीड दिवस ते 5, 7, 10 दिवस साजरा केला जातो. काही घरात गणपतींसोबतच गौरी आवाहनाचादेखील सोहळा रंगतो. मग यंदा या सेलिब्रेशनमध्ये तुमच्या मित्रमंडळांसोबत, घरातील नातेवाईकांना, सहकार्यांना आमंत्रित करण्यासाठी आकर्षक आमंत्रण पत्रिका बनवून निमंत्रित करण्यासाठी ही काही नमुना पत्रिका शेअर करून यंदाचं आमंत्रण अधिक आकर्षक बनवू शकता.
Ganesh Chaturthi 2021 Invitation Marathi Messages Format: maghi ganesh jayanti invitation card in marathi :यंदाचा गणेशोत्सव (Ganeshotsav) महाराष्ट्रासह जगभरात 10 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे. गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi) दिवशी गणपती बाप्पाचं आगमन सार्वजनिक मंडळांसह अनेक घरांमध्येही होणार आहे. घरगुती गणेशोत्सव किमान दीड दिवस ते 5, 7, 10 दिवस साजरा केला जातो. काही घरात गणपतींसोबतच गौरी आवाहनाचादेखील सोहळा रंगतो. आजकाल डिजिटल मीडिया आणि सोशल मीडियाचा बोलबाला असल्याने व्हॉट्सअॅप, फेसबुकच्या माध्यमातून आकर्षक आमंत्रण पत्रिका शेअर करून तुम्ही यंदाच्या गणेशोत्सवाचं आमंत्रण बनवू शकता
गणेशोत्सव 2021 आमंत्रण पत्रिका नमूना
नमुना 1 :
नमस्कार,
सालाबात प्रमाणे याही वर्षी आमच्या घरी दिनांक 10/9/2021 रोजी आपल्या लाडक्या गणरायाचे आगमन होणार आहे.तरी आपण सर्वानी सहकुटुंब सहपरिवार येऊन दर्शनाचा लाभ घ्यावा.
आपले नम्र
नमुना 2 :
ॐ श्री गणेशाय नम:॥
वर्षभरातून एकदा आमच्या घरी येणार्या गणरायाच्या या आनंद सोहळ्यात सहभागी होऊन बाप्पांचे आशिर्वाद घेण्यासाठी आपणास श्री आणि सौ यांसकङून आग्रहाचे निमंत्रण…
पत्ता :-
तारीख,वेळ
शुक्रवार 10 सप्टेंबर 2021 , सकाळी 9 वाजता श्रींची प्राणप्रतिष्ठा
नमुना 3:
आम्हाला आपणास कळविण्यास आनंद होत आहे की यंदाही आमच्या घरी श्री गणेश चतुर्थीला शुक्रवार दि.10/9/2021 ते मंगळवार दि.14/9/2021 रोजी गणरायाचे आगमन होणार आहे तरी आपण आपल्या परिवारासह दर्शनाचा लाभ घ्यावा.
आपले नम्र,
ठिकाण :
नमुना 4:
*llश्री* *गणेशाय* *नम:ll*
सालाबादा प्रमाणे यंदाही “बाप्पा”चे 10 दिवसाचे वास्तव्य आमचे घरी दि. 10-9-2021 ते 20-9-2021 पर्यंत आहे. तरी या आनंदसोहळ्या प्रसंगी आपण आपल्या संपूर्ण परिवार व आपतेष्टां सोबत आपल्या लाडक्या बाप्पाचे दर्शन व प्रसादाचा लाभ घेण्यासाठी जरुर यावे ही नम्र विनंती.
पत्ता:-
*आम्ही आपली वाट पाहत आहोत*
नम्र विनंती:-
नमुना 5:
आमच्या घरी दरवर्षीप्रमाणे लाडके बाप्पा येणार आहेत तेही 5 दिवसांसाठी ,त्यामुळे तुम्ही बप्पांच्या दर्शनासाठी यावे ही नम्र विनंती, शुक्रवार दि.10 सप्टेंबर 2021 ते मंगळवार दि.14 सप्टेंबर 2021 .
पत्ता :-
निमंत्रक :-
नमुना 6:
आम्हाला आपणास कळविण्यास आनंद होत आहे की यंदाही आमच्या घरी श्री गणरायाचे आगमन होणार आहे ,आपण आपल्या परिवारासह दर्शनाच्या लाभ घ्यावा ,आपले नम्र
तारीख :
ठिकाण :
वेळ :
नमुना 7:
आम्हाला आपणास कळविण्यास आनंद होत आहे की यंदाही आमच्या घरी श्री गणेश चतुर्थीला शुक्रवार दि.10/9/2021 ते शनिवार दि.11/9/2021 रोजी गणरायाचे आगमन होणार आहे तरी आपण आपल्या परिवारासह दर्शनाचा लाभ घ्यावा.
आपले नम्र,
ठिकाण :
Gauri Ganpati Invitation Messages in Marathi
घरगुती गणेशोत्सवामध्ये यंदा शुक्रवारी , 10 सप्टेंबरला गणपतीचं आगमन होईल. 12 ऑगस्टला गौराईचं आगमन आणि 13 ऑगस्टला पूजन होईल . माहेरवाशिणींसाठी गौराईचा सण म्हणजे धम्माल असते. पण यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तुमच्या मैत्रिणींसोबत ऑनलाईन माध्यमातून भेटणं, गौरी-गणपतीचं दर्शन घेणं सोयीचं ठरणार आहे.
नमुना 1:
सालाबादाप्रमाणे यंदाही आमच्याकडे श्रीगणराय आणि गौराईचे आगमन होणार आहे. तरी यंदा बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी खाली दिलेल्या ऑनलाईन लिंकवर भेट द्यावी ही नम्र विनंती!
गणरायाची प्राणप्रतिष्ठा – 10 ऑगस्ट, सकाळी 9 पासून
गौराई पूजन – 13 ऑगस्ट
नमुना 2:
गणपती बाप्पा मोरया
दरवर्षी प्रमाणे यंदाही 10 ऑगस्ट दिवशी आमच्याकडे गणरायाचं तर 13 ऑगस्ट दिवशी गौराईचं आगमन होणार आहे. तरीही आपण ऑनलाईन माध्यमातून बाप्पाचा आशिर्वाद घ्यावा ही विनंती!
वेळ-
गौरी पूजन तारीख- वेळ :
नमुना 3:
आम्हाला आपणास कळविण्यास आनंद होत आहे की यंदाही आमच्या घरी श्री गणेश गणरायाचे आगमन होणार आहे. आपण आपल्या परिवारासह दर्शनाचा लाभ घ्यावा.
आपले नम्र,
तारीख :
ठिकाण :
वेळ :
गणपती बाप्पा हा संकटमोचक आहे. मग यंदा त्याला घरी आणल्यानंतर त्याच्याकडे कोरोनातून सार्या जगाची मुक्ती होवो अशी कामना करताना अनावश्यक गर्दी होणार नाही याची काळजी घ्या. यंदा नातेवाईकांना, मित्रमंडळींना घरी बोलावण्याचा हट्ट टाळा आणि व्हॉट्सॅप, फेसबूकच्या माध्यमातून जगभर विखुरलेल्या तुमच्या मित्रमंडळींना, प्रियजनांना ऑनलाईन दर्शनाला आमंत्रित करून कोरोना व्हायरस आरोग्य संकट दूर ठेवण्यास मदत करा …
हे पण वाचा ⇓⇓
🙏🌺 गणेशोत्सव 2021🌺🙏
🙏🌺🌺गणपती बाप्पा मोरया🌺🌺🙏
सालाबादप्रमाणे या वर्षी देखील आमच्या घरी आपल्या लाडक्या श्री गणेशाचे दि:10/9/2021 रोजी 5 दिवस आगमन होत आहे तरी आपण सहकुटूंब,मित्रमंडळी सह बापाच्या दर्शनास यावे ही विनंती
निमंत्रक: गौरव सुरेश शेलवले
मू: कलंभे शहापूर
मो:9673955654