पहिला पाऊस असतो सगळयांना आपलंसं करणारा ,आंनद देणारा ,आठवणी ताज्या करणारा ,एक वेगळी ऊर्जा आणणारा ,सगळे जण वाट बघत असतात या पहिल्या पावसाची ,सर्वात जास्त आंनदि तर माझा शेतकरी होतो कारण तो पूर्ण वर्ष वाट बघत असतो या सरींची ,म्हणून आज तुमच्यासाठी घेऊन आलो खास पहिल्या पावसावर आधारित मराठी सुविचार ,कविता ,लेख आणि खूप आठवणी .monsoon sms in marathi , barish thought in marathi , paus quotes in marathi ,happy monsoon quotes in marathi ,first rain quotes in marathi यावर हा पूर्ण ब्लॉग आधारीत आहे आवडल्यास share करा आणि comment करा कस वाटलं ..😊
पहिला पाऊस
म्हणजे जणू काही नवीन आयुष्याला सुरवात झाली आहे
अस वाटायला लागतं ,
पत्र्यांवर पडणारे मोठ्या मोठया थेंबाच आवाज ऐकण्यासाठी कान तरसून गेले होते ,
का माहीत नाही पण पावसाळा नेहमी त्याच्या प्रेमात पाडतो यार जेव्हा कधी तो बरसत असतो ,
पडताना खूप साऱ्या आठवणी पण घेऊन येतो त्यातील काही सुखावणारे तर काही दुखावनारे असतात पण ठीक आहे यार..
पाऊस मी आणि आठवणी
पाऊस आला की सुरू होतात त्या आठवणी ते दिवस बालपणीचे जास्त पाऊस पडला की मिळालेली सुट्टी ,शाळेत जातात घातलेला raincoat किंवा छत्री आणि मुद्दाम पावसात थोडं भिजायचं ,केस ओले करायचे .
मधली सुट्टी झाली की बाहेर पडताना एकाच छत्रीत आम्ही सगळे मित्र बाहेर पडायचो आणि एकमेकांना ढकलत बसायचो ,पावसामुळे अभ्यासाकडे कोणाचेच लक्ष नसायचे ,सगळे लक्ष खडकीच्या बाहेर ,आणि आम्हाला अजून एक बहाणा मिळायचा वेळ घालवायचा ..
शाळा सुटली की चालू होईची ती खरी मजा ,जिथे जास्त पाणी साठलेल असायचं तिथे मित्रांना बोलून जोरात उड्या मारायच्या आणि त्यांना चिखलात माखून पळून जायचं ..
घरी आल्यावर आईचा मिळालेला ओरडा ऐकून शांतपणे कपडे बदलून बसायचं ..
कधी सुट्टी असली का बाहेर खेळायला जायचं, पपेराची बनवलेलं होडी वाहत्या पाण्यात सोडून शर्यत लावायची ,
खूप मजा यायची यार आणि आता तेच सगळं दिवस आठवून थोडं आंनद ही होतो आणि दुःख पण …
तुमची एक पावसाळ्याची आठवण सांगा ??
पहीला पाऊस
तुझा हात हातात घेऊनी,
त्या पावसात रमाव आणि ते
निखळ सुंदर तुझ रूप पाहाव,
तुझ्या सौंदर्याने निसर्ग सुध्दा खुलावा
तो पहिला पाऊस आपला असावा,
तुझ्या छुम छुम पायांनी
पाणी सुध्दा नाचाव,
त्याने आकाश सुध्दा आजून बरसावा,
तुझ्या हसण्यात तो गोडवा असावा
जो पहिल्या पावसात असावा,
तुझ्या सोबती मी आयुष्यभर असावा
त्यात तो आनंद असावा
त्याच मिठीत माझा शेवटचा श्वास असावा,
कारण तो पहिला पाऊस आपला असावा,
त्या पावसात खूप काही आठवणी असाव्यात
तो पहिला पाऊस आपल्या दोघांचा असावा……
-शुभम सोनबा जंगले
पहिला पाऊस , नकळत का होईना आज जुन्या आठवणी ताज्या झाल्या साचलेल्या आसवांना आज नवा बहाणा मिळाला….
मी पाऊस बोलतोय
मी नाही पडलो तरी तुम्हाला problem असतो
असतं थोड्या वेळ पडलो तरी मलाच बोलता
आणि जास्त वेळ पडलो का ,नको पडूस अस बोलता
म्हणून मी ठरवलंय आता मी कोणाचच नाही ऐकणार पडत रहाणार दिवसभर ..
पाऊस म्हणजे बरसणाऱ्या सरी.पाऊस म्हणजे बेधुंद लहरी..
पाऊस म्हणजे दाटून आलेले नभ..पाऊस म्हणजे वाफाळत्या चहाचा मग…
पाऊस म्हणजे बोचरा वारा..
पाऊस म्हणजे सुखवणाऱ्या गारा..
पाऊस म्हणजे चिंब भिजलेली सृष्टी..पाऊस म्हणजे निसर्गावर हिरवळीची वृष्टी..
पाऊस म्हणजे मनसोक्त भिजण्याचा आनंद ..
पाऊस म्हणजे ओल्या मातीचा सुगंध…
पाऊस म्हणजे मोराचा फुललेला पिसारा..
पाऊस म्हणजे अंगावर येणारा शहारा..
पाऊस म्हणजे मनातला गारवा..पाऊस म्हणजे भावनेतला ओलावा..
पाऊस म्हणजे वाहणारी कागदाची नाव .
पाऊस म्हणजे स्वप्नातील एक गाव..
पाऊस म्हणजे असंख्य आठवणी…
पाऊस म्हणजे चातकाच्या प्रतिक्षेची कहाणी…
-वैष्णवी मधुसूदनराव पालमकर
पाऊस…😇
वातावरणात जणू जेव्हा कोमल जाणीव होते तेव्हा पाऊसाची ओढ मनात येते..🍁
पाऊसाची चाहूल मनाला अगदी आनंदी करत असते..😊
पाऊस आला की चाहूल लागते आनंदीपणाची..😊
निसर्ग सुद्धा जणू नवा रूप घेतो..सर्वांना जणू आनंदाचा अनुभव होतो..😇
पाऊसात बिजण्याची जणू आपली वेगळीच मज्जा असते..
का माहीत मनाला नेहमी पाऊसाची ओढ असते✌🏻
पाऊसाच्या वातावरणात मन प्रसन्न होऊन जात असत🍁
का माहीत पाऊसच्या प्रत्येक थेंबात नवाच आनंद असतो..✨😇
-PRAFUL PATIL
पावसाला कवितेत कितपत घेता येतं यावर मत..
पावसाला तुझ्याइतकंच रेखाटता येईल मला?
प्रशंसा, उपमा की आणखी खोल जाता येईल..पावसासोबत.
की पाऊस उपमा म्हणून येतो तुझ्यासाठी कवितेत…
तसही पावसाला तुझी सर नाही
पावसाचीही तशी काही गरज वाटत नाही मला
तुझ्या ओल्या केसात भिजता येतच की मला..
आणि माझ्या शब्दांची होडी
तुझ्या किनारी उभी असतेच की कायमची
तरीही पाऊस हवाहवासा वाटू लागला तर
दोघेही मिळून पाहत उभे राहू की पाऊस
वाटलंच झेलावं पावसाला तळहातावर तर तसही करू…घेऊ चेहऱ्यावर थेंब थोडेफार…
हळूहळू भिजूनच जाऊ…..
पण त्याला कवितेत आणून करायचं काय?
नात्याला ओलावा पावसाच्या सरीनीच जपून राहतो असही काही नाही…..
-सुनामी….!
सुनिल नाटेकर
आता एकटाच भिजतो…
पाऊसाची सर जोरात आली….
येताना जुन्या आठवणी घेऊन आली ..
तोच पाऊस, तोच गडगडाट..
फक्त आता नव्हता, हातामध्ये हात..
बाईक वरची सैर नकोशी वाटली…
सोबतीला माझ्या, आता ती नव्हती..
पाऊसातला चहा आवडीचा माझा..
फुक मारून देणारी, नव्हती कोण आता..
केसाचा ओलावा आज जास्तच जाणवला…
ओढणीने केस पुसणारा हाथ,माझ्या जवळ नव्हता…
पाऊस मध्ये ऊब देणारी ,ती भेट आठवली…
माझ्या नशिबातली ती मीठी, राहूनच गेली..
पाऊस आणि तू, सोबतीला आहे समजतो..
आठवणीच्या पाऊसात आता एकटाच भिजतो…
-रोहन गणेश म्हात्रे
ढगाळ या वातावरणात, हवा मंद झाली…
मंद या हवेने, आठवण तुझी आली..
आभाळातून या, पाऊसाचा वर्षाव झाला..
प्रेमाच्या बंधनात भिजऊनी गेला..
पावसासोबत आली, थंड हवेची साथ..
तुझ्याच आठवणीत झाले, मन निस्वार्थ…
छत्री घेतली पावसात, वापर नाही केला…
पाऊसतला ओलावा हवाहवासा वाटला..
चिंब या पावसात, शरीर भिजून गेले…
दाटलेल्या या मनाला, कोरडचं राहावे लागले…
बरसला पाऊस, तरी मन भिजत नाही…
तुझ्याच साथीला आता मी, आयुष्य जगतोय काही…
– रोहन गणेश म्हात्रे
ज्यांच्याकडुन काहीच अपेक्षा नसते ते जेव्हा अचानक येतात तेव्हा खूप आंनद होतो तसाच आहे हा आलेला पाऊस …
पहिला पाऊस आला की सगळ्या Besties ला phone करून पावसात भिजायला बोलवायचं आणि खूप मज्जा करायची …
लहानपणी बहुदा सगळ्यांचाच आवडता ऋतू विचारल्यास पावसाळा अस पटकन नाव येयचं तोंडातून ,का कोणास ठाऊक पण तो आपल्या कोणीतरी जवळचा असावा असं वाटायचं ..
.
शाळा सुरू होईच्या आधी पाऊस सुरू होउदे तेवढीच आम्हाला मजा करता येईल ,हेच आम्ही देवाला सांगायचो …
मग एक दिवस अचानक गडगडाट सुरू झालं ,सगळीच कडे काळ्या ढगांनी केलेला काळोख ,आणि मग सुरू झाल्या त्या पावसाच्या सरी ….
.
आम्ही सगळे मित्र-मैत्रिणी अंगण्यात जमायचो आणि पावसाचा खूप आंनद घेयचो ,तो मातीतून येणारा सुगधं जणू काही तो आम्हाला त्याच्या अजून प्रेमात पाडत होता अस वाटायचं ,
दुसऱ्या दिवशी सर्दी झाली तरी चालेल पण पहिल्या पावसात भिजायचं हा नियमच होता ..😂
पाणी साठवून ठेवण्यासाठी आईने लावलेल्या भांडी ,आणि जिकडे तिकडे पाण्याने भरलेले दबकेच दिसत होते ..
आम्ही सगळे वेड्यासारखे ओरडत फिरत बसायचो ,आणि light गेल्यावर तर अजून जोरात ओरडायचो ,जाम मजा येयची यार ….😁
.
पावसाळा आला म्हणजे शाळे साठी काली सॅंडल ,raincoat किंवा छत्री अशी खरेदी झालेली असायची …
पण ते सगळं अस तरी शाळेतून येता जाता पाऊस आल्यावर आम्ही भिजायचोच आणि घरी काहीतरी एक नवीन कारण सांगत येईचो ….
मग कधी सुट्टी असली का कागदी होड्यांची शर्यत लावायचो ..
कधी गावी गेलो का मच्छी पकडायला जायचो आणि तेव्हा मच्छी खण्यापेक्षा पकडण्यात जाम मजा येयची ..
.
लहाणपण खूप भारी का होता माहीत आहे ?
कारण आपण छोट्या छोट्या गोष्टीत आंनद मिळवायचो कारण ते सोडून दुसरं काही आपल्याला माहीतच नसायचं …
.
आता मोठे झालो ,घराच्या इथे buildings झाल्या ,सगळं बदललं ,थोडे मोठे झालो का थोडी लाज वाटते लोकांना ,की आता काय पावसात भिजायचं ,लोक हसतील ,पण मी आजपण पण पहिल्या पावसात भिजतो कारण लोक हसतील म्हणून आपण आपले आंनद लपून तर नाहीना ठेऊ शकत ….❤️😊
हे पण वाचा ⇓⇓
पहिला पाऊस
पहिल्या पावसाच्या सरी येईल जोमात,
माझा शेतकरी राजा मग्न होईल आनंदात,
हा पहिल्या पावसाच्या दरवळणारा गंध मातीचा मनास सांगून जाईल…
निसर्ग त्याच्याच सोबतीला जो त्याचा साथ देईल…
मातीमध्ये रोवली बियं सुध्दा बघताय लाऊनीया आस,
जसा होतो कि, भविष्याचा भास…
शेतकर्यांनी धरली बैल जोडीची कास,
धरला नव उत्पन्नाचा नव चैतन्याचा ध्यास…
-Sagar sanjay mahajan
निसर्ग
रान हिरवे झाले, ओलीचिंब पायवाट
वाहे नद्या तुडुंब, काय *निसर्गाचा* थाट ॥ धृ ॥
झरा खळखळतो , डोंगराच्या कडेवरी
वारा झुळझुळतो, झाडांच्या फांद्यामधूनी
आब्यांच्या झाडाखाली, पडली सावली दाट ॥ १ ॥
ढग दाटले काळे,कोसळण्या धरेवरी
इंद्रधनु भोवती,रानाच्या क्षितिजावरी
सागराच्या किनारी,अंग भिजविते लाट ॥ २॥
कोकीळ कुहुकूहु,गाते तालात सुरात
आली दाणे टिपण्या,चिऊताई अंगणात
नको घाबरु चिऊ,कधीचे बघते वाट ॥ ३॥
–Shubhangi Satish Limbhare
पाऊस….
रिमझिम बरसणारा पाऊस,
प्रत्येक थेंबात भरभरून प्रेम असलेला पाऊस..
कोणाच्या तरी आठवणीत रडणारा पाऊस,
प्रेमाच्या त्या थेंबाने ओलेचिंब करणारा पाऊस..
उन्हात तपणाऱ्या त्या कोरड्या जमिनीला भिजवणारा पाऊस,
सुकलेल्या फुलांना उमलवणारा पाऊस..
हा पाऊस तुलाही खुप आवडतो,
हा पाऊस मलाही खुप खुप खुप खुप आवडतो….
-Saumyata Khobragade
लांब कुठे तरी फिरायला जावं….
सोबत पावसाची सर असावी….
हात तुझा माझ्या हातात असावा….
त्यात आयुषयभर साथ देण्याची आस असावी….
सोबत तुझी बडबड अन् मस्ती असावी….
त्यात प्रेमाची अनमोल भर असावी….
अडवायला सोबत कोणी नसावं….
ना कोणाला कोणाची बंधन असावी….
लांब कुठे तरी फिरायला गेल्या वर
लवकर परत जाण्याची घाई नसावी….
रमून जावं त्या पावसात चिंब
मधून मधून आडोश्याला थांबायला डोंगरावर एखादी खोप असावी….
बाजूलाच चहा ची टपरी,
अन् त्याच्या कडेच गरम गरम भजीची प्लेट असावी…
वाटत क्षण तो कधी संपू नये….
पण कल्पनेला सत्याची ओढ असावी….
जी आस सोबतीची माझ्या मनात आहे….
ती आस तीझ्या ही मनी असावी…..
लांब कुठे तरी फिरायला जावं….
सोबत पावसाची सर असावी….
-Rushikesh vilas kadam
श्रावणातील सरींत मी, सोबती तुझ्या भिंजाव…!!
मिठीत तुझ्या मी, प्राजक्त होऊन बरसाव…!!
सोबती तुझ्या मी, चहूकडे हिंडाव…!!
नयनात तुझ्या गुंतून मी, स्वतःलाच हरवाव…!!
हरवून तुझ्यात मी, स्वतःला तूला सोपाव…!!
हितगुज हृदयाशी साधून मी, हृदयात तुझ्या बसाव…!!
बसणाऱ्या सरींत, अधिर हे मन व्हाव…!!
आतुर होऊन मी, मेघ संगती रमाव…!!
प्रफुल्लित होऊन मी, मोर बनून नाचाव…!!
गोड लाजून तुला मी, मिठीत तुझ्या भराव…!!
-Kulnand chandratrusha
सरसरत्या त्या पावसाच्या सरा
ठेऊन सारे मन बाजूला, नाही कोणाचा निवारा
घेतला पहिल्या पावसाचा सहारा.
दुखः सारे त्यात वाहुनी
नाही कळले कोणास थेंब का
ते अश्रू डोळ्यातले.
-AJAY BALASAHEB SHIRSAT
सर पहिल्या पावसाची
आठवण पहिल्या प्रेमाची,
ना जाणे का पावला पावलावर जाणवे तुझी कमी?
श्वासात तु, भासात तु, शब्दांत तु, सहवासात तु,
नेहेमी हवा-हवासा वाटणारा तु,
सर पहिल्या पावसाची
आठवण पहिल्या प्रेमाची,
रम्य पहाट, धुक्याची लाट
झुळूक वाऱ्याची, तुझ्या आठवणींची,
किलबिल पक्ष्यांची,ओढ तुझी
लागता चाहुल तुझी वाढे धडधड काळजाची,
सर पाहिल्या पावसाची
आठवण पहिल्या प्रेमाची!
-Krutika pradip sarkate
आत्ता पावसाळा येईल
मन पुन्हा ओलं होईल
छत्री उघडू उघडू म्हणता
चिंब चिंब होऊन जाईल
कुणी तरी पावसा कडे
डोळे लाउन पहातंय
मळभ दाटल्या डोळ्यांचं
मन मात्र गातय
पाउस कधी मुसळधार
पाउस कधी रिपरीप
पाउस कधी संततधार
पाउस कधी चिडीचीप
आभाळभर डोळे आता
शोधत आहेत पाउस
कुणालाच दिसत नाही
पापण्यांमधला पाउस
खोल आठवणीचं बीज
अंकुरून येतं मनावर
वसंतात छाटलं असलं
तरी मन नसतं भानावर ..
-Manisha Vijay Borkar
आणि बरंच काही…!
दाटलेले नभ
ती सर,. तो गारवा
आणि बरंच काही…
भिजलेल्या वाटा
ते रान, तो डोंगर
आणि बरंच काही…
चिंब फुले
तो गंध, ती दरवळ
आणि बरंच काही…
बरसणाऱ्या धारा
ती वीज, ते मेघ
आणि बरंच काही…
मनातल्या भावना
ते मन, तो हर्ष
आणि बरंच काही…!!
-Asmita Gangale