परिवार-कुटुंबासाठी काही मराठी सुविचार | Family Marathi Quotes

Aagi Marathi Quotes

आजी मराठी quotes
aaji marathi quotes

Atya Marathi Quotes

आत्या मराठी quotes
आत्या मराठी quotes
आत्या
भारी असतात ना, नेहमी आपल्याला समजून घेणाऱ्या ,
थोडयाशा रागीट असतात पण तेवढ्यापुरताच ,
आपण कधी काही सागितलं का नाही बोलणार नाहीत ,
नेहमी कधी आल्या का विचारपूस करणाऱ्या आणि काहीतरी खाऊ घेऊन येणाऱ्या ,
आणि नेहमी हसून सगळं काही नीट करणाऱ्या असतात सगळ्या आत्या ..
Love u आत्या❣️

atya quotes in marathi
atya quotes in marathi

आत्या
थोडी रागीट पण नेहमी संकटात धावून येणारी ,
प्रत्येक परिस्तिथीत खांबीर पणे उभी राहणारी ,
माझे सगळे लाड पुरवणारी आणि मजा मस्ती करणारी ,
माझं काही काम असलं की घरच्यांना पटवणारी ,
काही चुकलं का माझ्यावर हक्काने रागणारी ,
पण त्याहून जास्त प्रेम करणारी ..
Love U आत्या


atya quotes in marathi
atya quotes in marathi

आत्या
काही झालं का लगेच घरी येणारी
मला खूप काही शिकवणारी ,माझ्या प्रत्येक गोष्टीत माझी साथ देणारी ,माझ्या मागे खंबीरपणे उभी राहणारी ,
आयुष्य enjoy करणारी आणि मजा मस्ती करणारी ,
नेहमी काहीतरी planning करणारी आणि आई – बाबांना पटवणारी ,
जे आहे ते स्पष्ठ बोलणारी आणि थोडी रागीट ,
तुझ्यासारखी आत्या सगळ्यांना मिळो ❤️


Mavshi marathi quotes

मावशी मराठी quotes
मावशी मराठी quotes
मावशी
असते नेहमी आपल्या आईला समजावणारी आणि आपल्याला support करणारी ,
नेहमी मस्त रहाणारी आणि enjoy करणारी आपली life ,open-minded,
काही चुकलं का आपल्याला समजावणारी ,
आपल्याला सल्ले देणारी आणि चूक झाल्यावर ओरडून नीट सांगणारी ,
तिला आपले सगळे प्रेम प्रकरण माहीत असतं फक्त ती secret ठेवते ,
खुप गोड आणि भारी असतात मावश्या..❣️

Mama marathi quotes

मामा मराठी quotes
मामा मराठी quotes

मामा प्रत्येकाचा life मध्ये एकतरी मामा लागतोच

जो आपले लाड करणारा ,नेहमी आपली बाजू घेणारा ,

आपल्यासोबत मजा मस्ती करणारा ,आपल्यासाठी आई-बाबांना समजवणारा ,

काहीही झालं तर मला फक्त एक phone कर अस सांगणारा ,

आपल्याला नेहमी धीर देणारा आणि support करणारा ..

Loveumama


Mama Bhacha Quotes in Marathi

mama bhacha quotes in marathi
mama bhacha quotes in marathi

मामा – भाचा
यांच्यातील नात खूप वेगळं असतं ,
ते दिसत नाही पण दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करता
जरी ते लांब रहात असले तरी काही झालं का भेटायला लगेच येतात ,
मामा कधीच भाच्याला निराश करत नाही ,जे पाहिजे ते आणून देतो ,
काही problem झाला का पाहिला phone मामाला जातो ,
मामा भाच्याची जोडी अशीच टिकून राहूदे ..


Vahini Marathi Quotes

वहिनी

खूप भारी असतात नेहमी आमची बाजू घेणारी आणि आपल्याला support करणारी ,

खूप उत्साही असतात आणि चूक झाल्यावर स्पष्ठ बोलणाऱ्या माझ्या भावावर खूप प्रेम करणाऱ्या ,

माझ्या आई-वडिलांचा चांगल्या सांभाळ करणाऱ्या आणि नेहमी हसरा चेहरा असतो त्यांच्या ,

खूप भारी असतात सगळ्या वहिनी ..❣️


Family Marathi Quotes

Family Marathi Quotes
Family Marathi Quotes

एका मुलाला काय हवं असत एक जॉब मिळावं चंगला पगार मिळवबा आणि आपले आई वडील खुश व्हावेत
एका मुलीला काय हवं असत खूप शिकावं आणि एक काळीज करणारा नवरा मिळवा की तो तिची आणि तिच्य आई वडिलांची कलगी घायव्ही.

आईला काय हवं असत आपली मुलं सुखात राहो आणि त्यांचं सगळं नीट व्हावं आणि त्यांचा सवसार सुखाचा व्हावा.

वडिलांना काय हवं असतं आपल्या मुलांनी खूप मोठं वाहव त्याच नाव खूप मोठं करावा आणि आपल्या मुलींसाठी एक चंगला जावई मिळावा..

आज्जीला काय हवं असतं आपली सगळी पोर नीट राहवोत आणि आपली नीट काळजी घेवोत .

आजोबांना काय हवं असत आपल्याला पण मुलांनी समझुंन घेवोत आणि आपल्या मुलाची सवसार सुखाचे व्हावेत.

एक लग्न झालेल्या मुलीला काय हवं असत की आपला नवरा नीट वागावं आणि त्याने माझी खूप काळजी घायव्ही.

एक लग्न झालेल्या मुलाला काय हवं असत आपला job आहे त्यात अजून बढती मिळावी आणि घरात पैशाची कधी कामु पडू नाही देता हवी आणि आपली बायको नेहमी खुश रहावी.


Long Distance Relationship,

च महत्व त्यंना विचारा जे आपल्या Family

ला सोडुन BORDER वर देशाच रक्षण करत असतात…


शेजारी कधीही मदतीला धावून येणारे ,

अशी नाती जी रक्ताची नसली तरी आपलंसं करणारी ,

काहीही special dish केली का आपल्या घरी आणून देणारे ,

तुम्ही या फिरून आम्ही लक्ष देऊ तुमच्या घराकडे अस धीर देणारे ,

काहीही गरज असली का कसलाही विचार न करता मदत करणारे ,

आमच्यासाठी ते फक्त शेजारी नाही तर  दुसरी family आहेत..


2020 वाईट होता ,खूप बेकार गेला सगळं मान्य आहे पण ह्याच वर्षाने तुम्हाला तुमच्या family सोबत घालवण्यासाठी वेळ दिला ,

जे बाबा कधी जास्त बोलत नसायचे त्यांच्या आवडी नावडी आणि त्यांच्या चेहऱ्यावर आंनद दिसला ,

तुम्हाला याने आतून strong बनवलं ,काही चांगले बदल आणले आपल्यात जे फक्त ह्या वर्षामुळेच झाले ,

आणि अस वर्ष वैगरे काही वाईट नसतो आपण ते कसं जगतो यावर सगळं अवलंबून अस ,

काही गोष्टी नसतात आपल्या हातात ते सोडून देयचं असतं ..


हे पण वाचा⇓⇓

1) आई बाबा मराठी सुविचार

2) भाऊ बहीण मराठी स्टेटस

3) मैत्री मराठी स्टेटस


Middle Class Family Story 🔥

Family Quotes in marathi
Family Quotes in marathi

Middle Class family
च आयुष्य म्हणजे कस एकदम भारी पण नसत आणि एकदम साधं पण नसतं ,सगळ्या गोष्टी कश्या एकदम balance असतात ,खूप adjustment नाही पण थोडी करावीच लागते ,

पण सगळ्यांपेक्षा सुखी असतात हे कारण आपली life आणि आपण बस एवढंच असतं त्यांचं ,
कारण सगळा खर्च वडिलांच्या पगारावर ठरलेला असतो पूर्ण पाहिन्याच्या ,

मग कधी पगार कमी आला का ताणतणाव किंवा भांडण होतात कुठल्या नी कुठल्या गोष्टीवरून ,

सगळे चांगले कपडे पण काही मोठं function असेल तरच घालायचे उगाच छोट्या छोट्या function ला कपडे ठरलेले असतात ,

मग कधी दिवाळीचा bonus भेटतो तेव्हा नवीन कपडे भेटतात घालायला ,आणि मूल पण adjust करून घेतात थोडे मोठे झाले का कारण त्यांना पण कळत आपली परिस्थिती कशी आहे ते ,

Middle class माणसं कंजूस नसतात रे त्यानां आपले खर्च बघून सगळं सांभाळून घेयचं असतं ,मग त्यात घरातील सामान असो , भाजी ,मुलांचं शिक्षण अजून खूप काही ते कसं adjust करतात त्यांनाच माहीत ,

बाहेर जास्त कधी जेवायला जाताच नाही ,आई घरीच सगळं बनवते आणि चव तर बाहेरच्याहून भारी असते ,
आपल्याला जास्त पैसा पण नको आणि काही नको आपलं normal आयुष्य आहे तेच बर आहे ,

कधी काही मोठी वस्तू घेयची असली का पाहिले त्याला कितीचा हफ्ता आहे हे calculation करून वस्तू घेईला लागते ,

बाबा नेहमी सांगतात सुखाचा सवसार म्हणजे 2 वेळच जेवण भेटतं आणि राहायला घर आहे ना बस झालं ,
तुला कसली कमी तर नाही आहे ना फक्त तुला कमवायचे आहे आणि खायचे आहे ..❣️


फॅमिली मराठी स्टेटस
Family Quotes in marathi

Emotions ….
काही गोष्ट अश्या होऊन जातात ना life मध्ये की त्याच दुःख कायम आपल्या मनात रहात ,कारण ते व्यक्ती आपल्या खूप जवळचे असतात आणि त्यांची आपल्याला सवय झालेली असते ,

पण शेवटी मरण आपल्या हातात नसतं ना जे होईच असतं ते होतच हेच तर आयुष्य असतं ..

आता ह्या corona मुळे किती जणांने आपल्या आई-वडील ,भाऊ -बहीण ,आजी-आजोबा ,मित्र-मैत्रिणी गमावले असतील त्यांच्यावर किती दुःख कोसळल असेल ह्याच आपण विचार सुद्धा नाही करू शकत ,

आणि त्यात पण शेवटच्या क्षणी सुद्धा त्या व्यक्तीला बघता येत नाही ,किती भयाण परिस्तिथी झाली असेल त्या व्यक्तीची .

आपण रोज बघतो एवढी लोक मरतात पण त्यांच्या families ला किती दुःख झालं असेल ह्याची आपण कल्पना सुद्धा नाही करू शकत

मी हे तुम्हाला का सांगतोय कारण एकदा ती व्यक्ती गेली का दुःख करून काही होत नाही म्हणून आहेत तेव्हाच काही राग वेगरे असेल तर सोडून द्या ,

काही भांडण झाली असेल तर माफी मागून टाका ,कोणी फसवलं कोणी काय केलं त्याला आता काही अर्थ नाही आहे ,जे होईच होत ते झाल ,

आत जे चालू आहे त्यावर लक्ष द्या उगाच छोट्याश्या कारणांवरून नात तोडू नका ,मान्य आहे त्यांची चुकी होती पण श्वास आहे तो पर्यंत सगळं आहे त्यानंतर सगळं संपत …

तो ego वेगरे सोडून द्या रे त्याने कोणाचच भल होत नाही ,एक चांगल माणूस म्हणून जगा ,

कारण तुम्ही आयुष्यभर एक चांगले माणूस म्हणून जगले ना तर ते लोक चांगले बोलावे म्हणून नाहीतर त्यातून जो आंनद आणि सुख भेटतो ना ,तो कशातच नाही आहे …❤️


Family Marathi Kavita

कधी रागावणारे, कधी हसलणारे.
तर कधी प्रेमाणे बोलणारे
पण प्रत्येक घरात आजी-आजोबा हवेत असोत ना थोडे म्हातारे

रात्री झोपतांना नातवंडांना गोष्टी सांगणारे
पाठीतुन वाकलेले का असेनात
पण प्रत्येक घरात आजी-आजोबा हवेत असोत ना थोडे म्हातारे

घरात नांदणारे, देवपूजेत दंगणारे
घराला घरपण आणणारे
म्हातारपणामुळे जर्जर झालेले का असेणात
पण प्रत्येक घरात आजी-आजोबा हवेत असोत ना थोडे म्हातारे

मुलाला मार्ग दाखवणारे सूनेचे कौतुक करणारे
घराला आधार देणारे
सुरकुतलेल्या चेह-याचे का असेणात
पण प्रत्येक घरात आजी-आजोबा हवेत असोत ना थोडे म्हातारे

©vikas vilas deo


1 thought on “परिवार-कुटुंबासाठी काही मराठी सुविचार | Family Marathi Quotes”

Leave a Comment