कारणं खूप भेटतील स्वप्न पूर्ण न करण्याची
पण ती गेलेली वेळ परत नाही मिळनार ..
आपल्याला अस नेहमी वाटत असतं की आपले सगळे मित्र – मैत्रिणी पुढे चालले आहेत ,त्यांना चांगले जॉब लागले ,सगळे settle झाले तरी अजून आपला कसलाच पत्ता नाही आहे ,पण अस काही नाही आहे तुमचे स्वप्न वेगळे आहेत त्यांचे वेगळे आहेत ,स्वताला कधी दुसर्यांसोबत compare करू नका ,वेळ लागला तरी चालेल पण भरकटू नका तुम्हाला जे करायचं आहे ते एवढं सोपं नाही आहे ..🔥
कठीण होत जाणार आहे
अजून कठीण होत जाणार आहे पुढचा काही प्रवास ,
जो तुम्हाला हार मानायला उत्सावेल ,भाग पाडेल ,तुमची परीक्षा घेईल
पण म्हणून धीर सोडू नका ,हीच वेळ असते जेव्हा तुम्ही परखले आणि निखरले जाता ,हीच वेळ असते जेव्हा सगळ्या गोष्टी तुमच्या विरुद्ध होत जातात ,हीच वेळ असता जिथे सगळे येतात पण तुम्ही निवडले जाता कारण तुम्ही हार मानलेली नसते ..
गोष्टी चुकीच्या घडत असतील पण ते फक्त काहीवेळेसाठी ..🔥
तुम्ही आयुष्यात काहीच नाही करू शकत
तुम्ही हरलेले आहात
तुम्ही रडके आणि weak आहात
तुम्हाला हे नाही जमणार सोडा ते
स्वताच तोंड बघ जाऊन आरश्यात
अशे जेव्हा लोक बोलतात ना तेव्हा वाईट वाटतं
कधी कधी आपण हार मानतो ,
पण तीच खरी वेळ असते स्वताला समजवण्याची की लोक बोलत राहणार आहेत आयुष्यभर ,ऐकून सोडून देयचं आणि आपलं काम करत राहायचे ,तुमचं success त्यांना उत्तर देईल ..🔥
जाणीव करून द्या
स्वतःला की तुम्ही कोण आहात
तुम्ही कुठे भरकटत चालला आहात लोकांच ऐकून
लोक बोलतात तशे तुम्ही नाही आहात
तुम्ही खूप strong आणि खंबीर आहात
तुमची बरोबरी इथे कोणी नाही करू शकत कारण तुम्ही खूप वेगळे आहात ,
जर तुम्ही ठरवलं तर कुठलीही गोष्ट शक्य करू शकता
तुम्हाला तुमचे काही स्वप्न आहेत आणि ते सोडून बाकी गोष्टीत अडकत बसू नका ,
कारण तुम्ही खूप successful होणार आहात पुढे जाऊन ..🔥
कुठलीही सुरवात केल्यावर तुम्हाला ती गोष्टी कमीत कमी 30 ते 50 दिवस न थांबता करावी लागेल ,त्यानंतर तुम्ही एका निर्णयावर येऊ शकता ,problem असा आहे की लोक सुरवात करत आणि 10-15 दिवस करतात ,आणि काही नाही झालं का सोडून देतात ,एवढया लवकर काही होत नाही ,थोडा वेळ द्या ..❤️😊
काही गोष्टी तुमच्या विरुद्ध होत असतील पण ह्या काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला पुढे खूप सुख देणार आहेत ,फक्त धीर सोडू नका ..
तयार रहा
अनोळखी लोक येणार आहेत तुम्हाला रडवायला ,फसवायला ,दुखवायला ,साथ देऊन एकटं पडायला ,या सगळ्यांना सामोर जायचं आहे तुम्हाला एकट्यानाच ,आणि मला माहित आहे तुम्ही तयार आहात ते ..❤️😊
Life मध्ये अशे खूप जण भेटतील जे तुम्हाला फक्त दुःख देतील ,ह्याच अर्थ असा होत नाही की प्रत्येक व्यक्ती तशी असेल ,
कारण तुमच्या life मध्ये येणारी प्रत्येक व्यक्ती ही तुम्हाला काहीतरी शिकून जाईल मग ती कोणीही असो ..
तुमचं तुमच्या आई वडिलांसोबत भांडण होतील एखाद्या विषयावरून ,जे त्यांना नाही पटणार ,याचा अर्थ असा होत नाही की ते तुमच्यावर प्रेम नाही करत ,उगाच त्यांच्याबद्दल गैरसमज करून घेऊन नका ,त्यांना नीट समजवा कारण ते तुमच्या चांगल्या साठीच सांगत असतात नेहमी …
Life मध्ये तुम्ही एकटे पडाल ,काहीच सुचत नसेल career बद्दल ,पुढे कस होईल वगैरे वगैरे ,तेव्हा फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला काय करायचं आहे life मध्ये आणि तुम्ही आता काय करत आहात तुमचं उत्तर तुम्हाला मिळेल ..❤️
जेव्हा तुम्हाला लोक ignore करतील ,तुमच्या बोलण्या किंवा वागण्यामुळे ,पण तुम्ही तशे नसाल ,तर स्वताला सिद्ध करत बसू नका ,काही वेळ निघून गेली का लोकांना आपोआप कळेल तुमचं महत्व आणि किंमत ,तुम्ही तुमचं काम चालू ठेवा .😊
जेव्हा आपले स्वप्न वेगळे असतात आणि आपण काहीतरी वेगळंच करत असतो आपल्या career मध्ये तर काही हरकत नाही ,जे तुमच्यसाठी गरज आहे ते पूर्ण करा पण आपल्या स्वप्नांना विसरू नका हळू हळू त्यावर पण काम करा ,कारण स्वप्न कधी संपत नाही ..🔥
जेव्हा तुम्हाला वाटेल की मला पण एका जोडीदाराची गरज आहे ,तेव्हा फक्त स्वताला 2 प्रश्न विचारा की फक्त मला गरज आहे म्हणून मी नात जोडायचा का ?
जेव्हा माझी गरज संपेल तेव्हा काय करायचं मग ?
तेव्हा तुम्हाला समजेल की गरजेपुरता नात जोडणं खूप सोपं असत पण पूर्ण आयुष्य बरबाद होऊन जातं समोरच्या व्यक्तीच …👍
स्वप्न
हा मीही पाहिलेत खूप सारे स्वप्न भविष्याचे पण खरच नुसते स्वप्न पाहून पूर्ण होतात का अस जर असतं तर सगळ्यांचे स्वप्न पूर्ण होईला पाहिजेत.
स्वप्न पाहणं आणि त्या स्वप्नांना खऱ्या आयुष्यात करून दाखवणं यात खूप फरक असतो.आपल्याला वाटतं कधी कधी यार आपण एवढी मेहनत करतो तरी आपल्याला यश का नाही करत पण खरं तर यश मिळत असतो पण तो खूप हळू हळू होत.
लोकांना वाटतं ही सगळी मोठी मोठी माणसं आहेत ती सगळीच काही आधी पासून श्रीमंत नव्हती सगळयांनी खूप struggle केलेला असतो त्यांच्या काळात तेव्हा कुठे ते आत्ता एवढे मोठं झाले आहेत.
स्वतःला विचारा की तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काय करत आहात का नुसतेच स्वप्न बघत आहात.
कधीतरी होईल असं पण की कोणी तुमच्या स्वप्नांना पाठिंबा नाही देणार पण ठीक आहे स्वप्नं आपले असतील तर त्यांना सामोरं जाण्याची पण ताकत आपल्यातच असली पाहिजे.
आणि जितपर्यंत लोक आपल्या स्वप्नांवर हसत नाही ना तितपर्यंत ती स्वप्न खूप छोटा आहे असं समजा.
लोक बोलणारे बोलून जातील त्याचं कामच आहेत ते फक्त तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम उभे रहा .,
बघा एक दिवस नक्की तुम्ही कोणीतरी खूप मोठी व्यक्ती बनाल ती बनल्यानंतर फक्त हे शब्द विसरू नका..😊✌️
खूप वेळा जेव्हा काही गोष्टी आपल्याला पाहिजे तश्या घडत नसतात ,खूप negative प्रश्न निर्माण होतात मनात की कस होणार ,
पण म्हणून चुकीचा निर्णय घेऊ नका ,जे तुम्हाला पाहिजे त्यासाठी अजून खूप मेहनत घ्यावी लागेल एवढं सोपं थोडीच आहे ते ,प्रत्येक दिवस ,प्रत्येक क्षण काम करावं लागेल त्यासाठी ,नुसतं विचार करू काही होणार आहे ,
सवयी बदलाव्या लागतील ,हे नाही जमलं तर दुसरं करा ,ते नाही जमलं तर तिसरं करा ते नाही जमलं तर वेगळं काहीतरी प्रयत्न करा ,
Problem कुठे होतो माहीत आहे ,आपण फक्त 1 ते 2 वेळा प्रयत्न करतो आणि तुला नाही जमणार म्हणून सोडून देतो तिथेच सगळं गणित चुकतं यार ,जर तुम्ही तिसऱ्यांदा प्रयत्न केले असते तर काय माहीत तुम्हाला त्यात success सुद्धा भेटली असती ,
आपण लोकांचं ऐकत बसतो ,की ते बोलतात तुला नाही जमणार हे सोडून दे ,दुसरं काहीतरी कर ,पैसे कमव आणि settel हो ,
पण problem settel होण्याचा नाही आहे यार इथे ,ते तर होणारच आहोत ,पण जे तुम्हाला पाहिजे ते नाही केलत तर काय उपयोग यार या life चा ,जो तुम्हाला सुख पाहिजे तो कधीच नाही भेटू शकत life मध्ये ,जरी खूप पैसे मिळाले तरीही ,आणि हे त्यांनाच समजेल ज्यांचे खरच काही स्वप्न आहेत ,
नाहीतर मग तुम्हाला पण इतरांसारखच जॉब करत आणि त्याच जॉब ला रोज शिव्या देत जगावं लागेल ,माहीत आहे यार reality मध्ये खूप problems असतात ,पण हेच तर आयुष्य आहे यार जो यावर मात करून काहीतरी करतो ना ,तोच मोठा कोणीतरी होतो ,नाहीतर normal आयुष्य तर सगळेच जगत आहेत यार ..
आयुष्यात खरच तुम्हाला काहीतरी मोठं करायचं असेल तर mindset बदलावं लागेल ,खूप गोष्टींचा त्याग करावा लागेल ,सोपं काहीच नसेल हे कायम लक्षात ठेवा ,निर्णय तुमचा आहे ..😍
21 ते 30 वयामध्ये
मध्ये pressure असतं
एक चांगला जॉब शोधण्याच , लग्न करण्याचं ,नवीन जबाबदाऱ्या घेण्याचं ,स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्याचं , settle होण्याचं ,त्यात अजून घरातील problems वैगरे अस खूप काही घडत असतं पण ..
थांबा यात तुम्ही तुमचे स्वप्न विसरू नका कारण तेच तुमचं ध्येय आहे ..🙏😊
आज एक promise
स्वताला द्या की तुला निर्णय घ्याव लागेल
तेच तेच रोजच्या सारख जगून काही होणार नाही आहे
तुला बदलावं लागेल स्वतःसाठी ,स्वतःच्या स्वप्नांसाठी ,सगळं तुझ्या हातात आहे ,त्रास ,दुःख होईल पण त्यांनंतर जो सुख आणि आंनद भेटणार आहे तो कितीतरी मोठा आहे ,चला कामाला लागा .
Job चा कंटाळा आलाय ?
जे काही करत असाल ते चालू ठेवा जरी नसेल आवडत तरीही ,कारण आता परिस्तिथी तशी नाही आहे ,पण side by side तुमच्या स्वप्नांवर काम करत रहा ,कारण शेवटी आपल्याला तेच करायचं आहे जे आपल्याला आवडतं ,शेवटी निर्णय तुमचा आहे ,तुम्हाला काय करायचं आहे ते ..🔥😊
असतात अशे दिवस
जेव्हा तुम्हाला कोणी support नाही करत
जेव्हा सगळ्या गोष्टी तुमच्या विरुद्ध होत असतात
खूप negative विचार येतात की आता कस होईल माझं ,
जेव्हा वाटतं की आता सगळं संपलं ,
पण हेच ते दिवस असतात ज्यात तुम्हाला थोडं संघर्ष ,प्रयत्न ,सहन करावा लागेल ,सोपं काहीच नसतं कारण तुमचे स्वप्न पण सोपे नाही आहेत हे कायम लक्षात ठेवा …