20+Corona Quotes in Marathi | कोरोना मराठी प्रेरणादायी सुविचार

corona motivational marathi lekh
corona motivational marathi lekh

हा तुम्हीच ,जे आता ही पोस्ट वाचत आहात ,काय झालं हार मानलित एवढया लवकर ,मला माहित आहे तुम्हाला भीती आहे ती मरणाची ,मी गेलो/गेले तर माझ्या family च पुढे कस होणार याची ,सगळे negative विचार येत असतील डोक्यात .

पण असं काही होणार आहि आहे ,तुम्ही एकदम फिट आहात ,तुमच्यासारखेच कोरोनग्रस्त खूप patient ,negative होऊन घरी पोहोचले आता पुढचा तुमचा no आहे ,
तुम्हाला पण लवकर फिट होऊन घरी जायचं आहे ना ?
आपल्या मुलांना /मुलींना बघायचं आहे ना ?
आपल्या नवरा /बायकोला भेटायचं आहेंना ?
हो मला माहित आहे याचं उत्तर हो असेल पण त्यासाठी तुम्हाला या कोरोना ला हारवायला लागेल .

Physically doctors तुम्हाला बरे करतीलच पण mentally strong होणं खूप गरजेचं आहे ह्या परिस्तिथीमध्ये ,
आणि आता बाकी कसलाच विचार करू नका आता थोड्याच दिवसात तुम्ही बरे होऊन घरी जाणार आहात ,आपल्याला hospital मध्ये जास्त दिवस थोडीच रहायचं आहे ,तुमचा इथवरचा प्रवास खूप कठीण होता माहीत आहे आता इथून पुढे सगळं चांगलं होणार आहे ,
आणि मी या जगात नाही राहिलो तर ?
मला काय झालं तर ?
मला माझ्या family ला भेटता तर येईल ना ?
अस negative विचार आजपासून पूर्ण बंद करा .

आणि तुम्ही खूप strong आहात ,तुमची family घरी वाट बघत आहे तुमची की माझे आई/बाबा /नवरा /बायको/मुलगा/मुलगी /ताई /दादा घरी कधी परत येणार आहेत त्याची,आणि तुम्ही कश्यासाठी अशे negative विचार मनात आणत आहात ,
आणि अस विचार करा तुम्ही घरी पोहोचल्यावर तुमची family खूप खुश होईल त्यांच्या चेहऱ्यावर खूप आनंद होईल ,तुम्हाला त्यांच्या सोबत अजून खूप आयुष्य घालवायचा आहे ,तुम्ही इतक्यात कुठे चालला आहात ..

ही वेळ थोडी कठीण आहे पण काही हरकत नाही ,जेव्हा घरातले तुम्हाला phone करतील ना तेव्हा त्यांना सांगा ,तुम्ही काही काळजी करू नका मी लवकरच घरी येणार आहे आणि ते ही सुखरूप ,कारण मला तुमच्यासोबत पूर्ण आयुष्य घालवायच आहे .

रोज सकाळी उठल्यावर स्वतःला एकच गोष्ट सांगा मला आता इथे जास्त दिवस नाही राहायचं आहे ,म्हणून जे doctors सांगितली ती औषध घ्या ,ते सांगतील तस करा ,त्याचं एका ,बाकी पैश्याच तुम्ही विचार करू नका ,तुमची family तुमच्यासाठी काहीही करतील कारण त्यांना तुम्ही पाहिजे आहात बाकी सगळं नंतर कमावता येईल ..
तुम्ही आहात तर सगळं आहे म्हणून तुमचं असणं गरजेचं आहे बाकी काही नाही ..

आणि हे वाचल्यावर डोळ्यात पाणी आलं असेल तर लगेच पुसा कारण मला तुमच्या चेहर्यावर फक्त एक smile बघायची आहे आणि फक्त थोडे दिवस इथे काढा कारण family ला भेटायची वेळ जवळ आली आहे .

परत एकदा सांगतो की तुम्ही खूप strong आहात हे कोरोना वैगरे काहीच नाही आहे तुमच्यासमोर ,फक्त वाईट विचार आणू नका डोक्यात ,जे काही असेल त्याला सामोर जा ,पुढच्या काही दिवसात तुमचा नवीन प्रवास चालू होणार आहे आयुष्याचा ,धन्यवाद 🙏🔥

-सचिन वारदे

 

corona quotes in marathi
corona quotes in marathi

corona marathi motivational quotes
corona marathi motivational quotes

कोरोना positive आल्यावर …
आता कोरोना च प्रभाव वाढलं आहे म्हणून तुमच्या घरातील माणसं असो ,तुमचे नातेवाईक असो ,तुमचे मित्र मैत्रनि असो ,जेव्हा अचानक कोणाचं phone येतं की ते postive झाले आहेत ,तेव्हा एक वेगळीच भीती आणि काळजी निर्माण होते त्या व्यक्तीबद्दल आणि त्याचं काही वेळ थोडं कठीण जाणार आहे पण त्यांना न घाबरवता,धीर द्या आणि सांगा कि..
.
“” काही हरकत नाही जर तुम्ही positive आले असाल तर ,अशे खूप जण आहेत जे positive येऊन सुद्धा लगेच बरे झाले आहेत ,
आणि घाबरू तर अजिबात नका ,जर तुम्हाला काहीच त्रास होत नसेल तर जे doctors सांगतील ते करा आणि घरीच qurantine व्हा बाकी तुम्हाला जे काही लागेल ते आम्हाला सांगा ,आम्ही आणून देऊ ..
.
Positive आल्यावर भीती असते मान्य आहे ,पण तुम्ही बरे होणार आहात लवकर ,आणि जास्त negative विचार करू नका की अस झालं तर आणि तस झालं तर ,काही होत नाही तुम्हाला ,उगाच बाकीच्या गोष्टींचं tension घेयचं नाही ,स्वतःला जपा ,स्वतःची काळजी घ्या ,तुम्ही strong आहात एकदम अस घाबरून कस चालेल ,मस्त लवकरात लवकर बरे व्हा ,मग आपण भेटू आणि खूप मजा करू ..
स्वतःला busy ठेवा ,फक्त घरात बसून राहू नका ,काहीतरी काम करत रहा ,नवीन नवीन गोष्टी शिका mobile मधून मग कधी तुमचे दिवस निघून जातील कळणार सुद्धा नाही .
.
त्यांना सांगा काही positive लोक कशे लवकर बरे झाले हे ,म्हणजेच तेवढाच त्यांना धीर मिळेल ,कोरोना च बाकी काहिनाही पण सर्वात जास्त mentally पण माणूस strong लागतो हे लक्षात ठेवा ,कारण आपण काय विचार करतो यावर वरून आपण तस वागतो आणि करतो ,
.
“म्हणून विचार positive ठेवा मग तुम्ही लवकरच negative याल हे कायम लक्षात ठेवा ..”


कोरोना patient साठी special Motivational Post

corona motivational quotes in marathi
corona motivational quotes in marathi

हा तुम्हीच ,तुमच्याशी बोलत आहे मी ,आता कोरोना कसा झाला ते सगळं जून झालं आहे ,आता या पुढे तुम्हाला कस जगायचं या बद्दल थोडंस सांगतो ,
पाहिली गोष्ट tension घेणं बंद करा की मला कोरोना झाला आहे ,मी जगेन की नाही ,मला काही झालं तर ,ह्याच आता विचार करून काही उपयोग नाही ,

आता जे आहे त्याला सामोर जायचं आणि आपल्या doctors ला सहकार्य करा ,
आणि तुम्हाला काहीनाही होणार आहे ,तुम्ही सुखरूप आपापल्या घरी येणार आहात ,ते फक्त आपले भास असतात ..
तुमच्या family मध्ये कोणाला झाल असेल तरी जास्त विचार नाही करायचं आपले आई,बाबा ,भाऊ ,बहीण ,मित्र किंवा मैत्रीण कोणीही असेल तर एकदम फिट होऊन हसत हसत घरी येतील की नाही बघा थोड्या दिवसात …

तुम्ही खूप strong आहात ,आपल्या fitness कडे लक्ष द्या, बाकी आयुष्य पडलं आहे तुमच्यासोमर enjoy करायला ..
Hospital मध्ये खूप negative विचार येतात पण त्यालाच आपलं घर समजून ,त्या वेळेला सामोर जा ..

कोणीही तुम्हाला विसरलेले नाही आहे ,सगळे तुमची वाट बघत आहेत की तुम्ही घरी सुखरूप कधी परत येणार आहात ते ,

तुमच्याशिवाय त्याच आयुष्य पण अर्धवटच राहणार आहे ,
बाकी कसलाच विचार करू नका पुढे कस होईल वैगरे ,जे होणार आहे ते चांगलंच होईल जर तुम्ही लवकर बरे

झाले तर म्हणून स्वतःचा विचार करा बाकी सगळे ठीक आहेत …

Report negative आणि विचार positive होईला वेळ लागणार नाही ,आम्ही तुमच्यासाठी रोज देवाकडे प्रार्थना करत असतो म्हणून आता सगळं ठीक होणार आहे तुम्ही लवकर बरे व्हा ..❤️


जेव्हा लोक positive येतात ?
कोरोना ची Reality 😢

corona motivational marathi lekh
corona motivational marathi lekh

आपली building असेल किंवा गाव असेल ,हल्ली तर सगळीकडेच कोरोना चे patient भेटत आहेत ,आणि तेपण खूप प्रमाणात ,

पण जेव्हा एखाद्या building मध्ये एखाद्या घरात एक व्यक्ती positive भेटते ,त्यांना हॉस्पिटल मध्ये नेल जात ,

त्यानंतर त्यांच्या घरावर जे दुःख कोसळत ते कोणीच सांगू शकत नाही ..

थोडी भीती वाटते की आपल्या जवळच एक positive व्यक्ती भेटला आहे ,पण याच अर्थ असा होत नाही की तुम्ही त्यांच्याशी बोलणं टाकून द्याल ,

त्यांना ignore कराल ,त्यांना वाळीत टाकून द्याल ,त्यांना एक phone सुद्धा लावणार नाही ,कातर ते कोरोना चे patient आहेत म्हणून ..😢

मग तुम्ही शेजारी राहून तुमचा काय फायदा यार ,त्याच वेळेला तर त्यांना आधाराची गरज असते ,

motivation ची गरज असते ,कोणी तरी आहे आपल्या सोबत या जाणीवाची गरज असते ,तुम्ही भेटू नाही शकत ,

पण एक साधा call करून तरी बोलू शकता ना ,काय पाहिजे का ? ,काही आणून देऊ का ? एवढं basic तरी विचारू शकता ना ,

गोष्ट पैश्याची नाही यार पण जर एवढया कठीण परिस्तिथीत तुम्ही त्यांना साधं एक call

करून बोलू नाही शकत तर काय उपयोग यार मग शेजारी असून तुमचा …😞

प्रत्येकावर कधी न कधी तरी वेळ येते हे लक्षात ठेवा ,जेव्हा हे सगळं स्वतःसोबत होत ना तेव्हा मग कळतं ,

किती वाईट वाटतं ते ,जेव्हा कोणी साधी विचारपूस सुद्धा करत नाही .
त्यांना पण तुमच्याकडूनच काही अपेक्षा असतील ना की मला माहित आहे हे आमच्यासोबत असतील नेहमी ..😊

त्यांचा विश्वास कधी तोडू नका कारण तुम्ही जसे लोकांसोबत वागता तसेच लोक तुमच्यासोबतही वागतील ..
विंनती करतो की आजूबाजूला ,बिल्डिंग मध्ये तुमच्या कोणी positive असेल तर बाकी काही नाही एक call करून विचारपूस नक्की करा ..🔥

Share करा ही post प्रत्येक व्यक्तीसोबत कारण आता नाही तर कधीच नाही ..🔥👍

By :-@sachin_warde


corona quotes in marathi
corona quotes in marathi
हे आयुष्या ,
तू कोरोना दाखवलस ,
तू कोरोना दाखवलस ,
आता आम्ही त्यासोबत जगणं दाखवू तुला ..

corona quotes in marathi
corona quotes in marathi
कोरोना ला 3 गोष्टी हरवू शकतात
प्रतिकारशक्ती
मानसिक शक्ती
आत्मविश्वास

corona quotes in marathi
corona quotes in marathi

घरात बसून वाटत असेल की कंटाळा आलाय ,कुठून पैसे येत नाही म्हणून खूप tension असेल ,काय करू काही सुचत नसेल पण थांबा आता ह्या सगळ्याच विचार करून काही होणार नाही अजून थोडे दिवस मग एवढ्या जोरात business किंवा job की तुम्ही खूप खुश व्हाल आता ,तोच जॉब किंवा business कसा वाढवायचा यावर विचार करा ..❤️


काळजी घ्या यार
कारण मला तुमच्यासारखे नको
तुम्हीच पाहिजेत ❤️

corona quotes in marathi
corona quotes in marathi
संकटांनो तुम्हाला काय वाटलं आम्ही घाबरून जाऊ
आणि हार मानू ,अरे उलट या दिवसात आम्ही
अस काहीतरी करून दाखवू त्याच तू विचार सुद्धा केला नसशील ,
हार मानणं तर खूप लांबची गोष्ट आहे रे 🔥

Corona..🍁
जवळ जवळ जेव्हा पासान कोरोना आलाय तेव्हा पासन लोकांचं जीवन जगणं थोड अवघड झालंय.🙂

कारोना ने एवढ माञ शिकवलं जीवन जगणं जेवढ सरळ वाटत असत तेवढ सरळ नसत.☑️

या 1 वर्षात लोकांनी बरच काही गमावलं असेल याची कुणाला कल्पना ही नसेल.💥

परंतु ईश्वर पुन्हा सगळ व्यवस्थित करेल पुन्हा एकदा जग नवीन सुरू करेल.✨

ईश्वरा कड एकच मागणी नको होऊ देहूस कुणाला कोरोना ची लागनी.

हे ही दिवस जातील
आणि पुन्हा आनंदाचे दिवस येतील.

दिवस पुन्हा बदलतील
लोक पुन्हा निवांत जगतील.😊

Praful Patil…


भूक

Lockdown मुळे खायला नाही
बरोबर लागली आहे भूक……….
हे परमेश्वरा🙏 आम्हा गोरगरिबांना
कधी मिळणारे बर सुख..😌😌😌…….

संकटाच्या वेळी घरापासून दूर राहण्याचे,
होत आहे आम्हाला दुःख…….
आम्हा गरिबांच्या मुला, बाळांची
जानेल कोण बर भूक……….

रोज चहा बिस्कट खाऊन आम्ही मिटवून रहलो भूक
पण कधीपर्यंत चालणार अस 😐
केव्हा मिळणार बर आम्हाला भाकरीचे 🍪सुख…….

आज corona काल मध्ये लोकांच्या
वाटेला आलेले आहे दुःख……..
कारण corona ne हरवून घेतले आहे सर्वांचे दुःख…..

शेवटी घराबाहेर पडण्याची करू नका चूक……
नाहीतर corona तुम्हाला बिमार करून ……
पुन्हा मिटवनार आम्हा गरिबांची भूक………

😷# Stay safe #stay healthy#😷

…….by स्वाती सौंदळे…..


corona marathi quotes
corona marathi quotes
हे पण दिवस जातील
थोडं patience ठेवा
आणि घरात रहा

corona marathi quotes
corona marathi quotes
हे दिवस तुम्हाला आता खूप boring
वाटत असले ,तरी हेच दिवस तुम्हाला
भविष्यात खूप सुख देणार आहेत .

corona marathi quotes
corona marathi quotes
ही लढाई आहे
आपल्या patience ची
आपल्या जिद्दीची
आपल्या ताक्तीची
आपल्यातल्या गोड नात्याची
आपल्या पुढच्या सुंदर भविष्याची.✌️

अरे तू positive त्यात मी सुद्धा…गौरी आणि अनुला काय सांगू… इथे वादळ वारा त्यात तु नाही जवळ…डॉक्टर बोलले इथे नाही करता येणार उपचार तुम्ही पेशंट ला दुसरीकडे न्यायची सोय करा …सांग बर या तोक्ते ने रस्ता जाम त्यात तू असा पडलेला श्वासात अडकलेला….फोन बंद पाकीट खाली..लाईट ही नव्हती रस्त्यावर….भर पावसात गाडीत भरल तुला…हॉस्पिटल गाठल..तू दोन दिवसात छान बोललास की माझ्याशी… म अचानक तिसऱ्या दिवशी तू … मी चाललो ग आता ,सांभाळ हा स्वतःला,माझ्या छकुल्या बाबा बाबा करतील…माझ्या आठवण काढतील…त्यांना पण मग माझ्याशिवाय करमनार नाय…रात्री झोपताना बाबा अंथरूण टाका ना..बाबा जेवायला द्या ना..बाबा आज माहितेय का शाळेत काय झालं…आणि हे सर्व ऐकायला मी नसेल..तेव्हा तू सर्व ऐकून घे त्यांचं..माझी आठवण आली तर रडू नकोस खंबीर बन… धीट रहा…मला मनात साठव…आपल प्रेम आठव..आठव ते आपण एकत्र कॉलेज मध्ये असताना कसा मे तुझ्याशी बोलायचा प्रयत्न केलेला…आणि मग कस आपल प्रेम मान्य झालं..किती भारी लग्न थाटल ग..छान संसार केला दोन गोड मुली झाल्या…आणि आता मात्र मला इथून एक्झिट घ्यावी लागेल…अग मी नेहमी असेल तुझ्यासोबत…तू हिम्मत हारू नकोस…आठव ना मला…सगळ आठव…रडू नको शांत रहा…आणि हो डॉक्टर माझी बॉडी देणार नाहीत तर भांडू नकोस …तिथे मला शेवटचं डोळे भरून बघून घे…आणि मला निरोप दे देशील ना….
-कार्तिकी सुनिल चूरी

corona marathi quotes
corona marathi quotes
त्यांना पण आपले आई वडील आठवले असतील ,
जे आई वडिलांना एकटे सोडून बाहेर देशी रहात होते ,
यातून हेच सांगायच आहे की आई-वाडीलांशीवाय
सगळं शून्य आहे .🔥

lockdown marathi quotes
lockdown marathi quotes

हा तुम्हीच हे घरात बसून ही post वाचत आहेत ,मला माहित आहे खूप critical situtaion झाली आहे ,पण यार होईल सगळं ठीक रे ,बबातम्या बघून खूप tension येत आहे पण जर तुम्ही बाहेर पडलेच नाही तर काहीच नाही होणार आहे तुम्हाला हे लक्षात ठेवा ,आणि जो काही वेळ अपल्या family सोबत भेटला आहे त्याचा पुरेपूर फायदा घ्या कारण अस खूप कमी वेळा होत life मध्ये .


Corona Warriors quotes in Marathi
Corona Warriors quotes in Marathi
Thank-you
त्या सगळ्यांच मग ते doctors ,nurse आणि hospital
चा प्रत्येक member जो आपली स्वतःची life risk मध्ये
घालून या virus पासून लोकांना बरे करत आहेत ,
जेवढं दिसतं तेवढं सोपं नसतं यार ,हे आपण फक्त या corona virus
च्या नावाने घाबरून गेलो आहोत ,विचार करा ते तर त्यांना
treatment देतात रोज आणि आम्हाला खात्री
आहे की तुम्ही सगळ्यांना बरे कराल .

lockdown marathi quotes
lockdown marathi quotes
हीच वेळ थोडी कठीण आहे पण आपण सगळ्यांनी ठरवलं
तर काहीही करू शकतो ,भीती सगळ्यांच्याच मनात आहे
रे शेवटी आपल्या life चा प्रश्न आहे ,
म्हणून बाहेर पडू नका मग काहीही असुदे ,
हया सुट्या नाही आहेत ,हइ लढाई आहे आपली आणि जीवनाची .

Quotes on coronavirus in Marathi
Quotes on coronavirus in Marathi

बाहेर पडू नका
कारण फिरायला काही problem नाही पण समजा तुम्ही हॉटेल मध्ये गेलात ,
पण तुम्हाला हे थोडी माहिती आहे की तिथे आधी कोण होत किंवा त्या व्यक्तीला काही आजार होता का ,म्हणून बाहेर पडू नका काही दिवस ,नसेल जमत तर जमवाव लागेल कारण यात तुमचीच safety आहे यार ही गोष्ट विसरू नका ..❤️


कोरोना तर आता आलाय पण आम्ही
आधीपासूनच लोकांपासून चार पाऊलं लांब आहोत ..

corona marathi motivational quotes
corona marathi motivational quotes

आमचे SantaClause तर आमचे Doctor ,Police
आणि सफाई कर्मचारी आहेत ,कारण ते होते म्हणून आम्ही
आजचा दिवस बघितला आहे ,त्यांच्यामुळे आज आम्ही घरात
सुरक्षित राहिलो हा पूर्ण वर्ष ते आमच्यासाठी झटत होते कसलाच
विचार न करतात ,खूप कठीण होत सगळं पण आज आम्ही जिवंत
आहोत तेच मोठं gift आहे आमच्यासाठी ..❤️

corona marathi motivational quotes
corona marathi motivational quotes

कोरोना ???
हा नाव ऐकून खूप कंटाळा आला असेल माहीत आहे पण काय करणार आपल्यावर संकट पण तेवढंच मोठं आलं आहे ना ,

काय करायचं काहीच सुचत नाही आहेत ,tv वर news वर news दाखवून अजून भीती वाढत आहे ,

आपली safety आपल्या हातात आहे जर तुम्ही वेळेवर ,घरी आल्यावर हाथ नीट धुतलेत ,तोंडालात झाकलत

,बाहेरच खाण टाळलंत अजून थोडे दिवस तर ते आपल्यासाठीच चांगलं आहे, आणि हा virus पण जास्त वेळ नाही टिकणार रे आपल्या इथे जास्तीत जास्त 2 ते 3 महिने त्यानंतर हा पण गायब होईल जसे आधीचे virus होते ,

आणि जर आपण काळजी घेतली तर आपल्याला काहिनाही होणार रे ,
आणि normal ,सर्दी ,खोकला झाला तर के लगेच corona वेगरे नसतो पण म्हणून लगेच checkup करून येयचं मनात शंखा नाही ठेवायची ,

एवढे आजार येऊन गेले त्याने आपल्याला काहिनाही झालं तर corona काय करणार आहे ,

पण म्हणून बिनदास राहू नका आपली काळजी घ्या ,जास्त tension घेऊ नका सगळे safe राहतील अशी मी देवाकडे प्रार्थना करतो .❣️🙏


कोरोना ला घाबरायचं नाही
जरी तुम्ही positive असला तरीही ,कारण आता खूप जण बरे होत आहेत ,आणि आता घरात राहून पण बरे होतात ,जे doctors सांगतील ते करा ,सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झालं असेल तर घाबरायचं नाही ,तुम्हाला काही होणार ,मृत्यू हे कोरोना पेक्षा घाबरून जास्त होत आहेत हे लक्षात घ्या ..


corona marathi motivational quotes
corona marathi motivational quotes

Unlock 1 ला सुरवात 2020
Lockdown सगळीकडे उघडण्यात आला आहे mostly ,containment zone सोडून आता हळू हळू सगळं पूर्व पदावर येणार आहे ,सगळ्या companies regular चालू होतील ,

सगळी दुकानं चालू होतील मग ते खण्यापासून ते पापेरवला पर्यंत ,लोक कामाला जाईला सुरवात होणार ,काहींचे business चालू होणार परत त्याच जोशाने फक्त आता सुरवातीला एवढे चालणार नाहीत पण हळू हळू त्यांना पण जोर पकडले ,

1 ते 2 महिन्यात शाळा ,colleges चालू होणार ,फक्त ह्यावेळी उत्साह थोडा जास्त असेल शाळेत जाण्याचा कारण कोणीच भेटलं नाही बोलायला .❤️

पहिले तर social distancing च पालन होईल पाहिजे कारण सगळं चालू झाला असलं तरी रुग्णांची वाढ झपाटयाने होत आहे ,पण बरे पण त्याच speed नि होत आहे ,कारण आपल्याला पैसे पण कमवायचा आहे आणि काम पण करायचं आहे

म्हणून आता स्वतःची काळजी स्वतःच घ्या हे तुम्हाला lockdown मुळे कळलच असेल का ते ,आणि जर नाही तर मग तुम्ही आपल्या family ला पण संकटात टाकत आहात ..👍

खूप काही बदलणार आहे पण ,
लोक एकमेकांसपुन जर लांबच रहातील ,भेटी वगैरे तर आता विसरूनच जा फक्त लांबूनच नमस्कार करायचं ,मग कोणी मोठा असो व लहान ,बोलणं-चालणं जरा कमी होईल काही महिने काही हरकत नाही तुम्ही एक मेकांना भेटलात ना तेच खूप आहे ..

Locals train अजून तरी काही निर्णय नाही आला मला वाटत आहे ते सगळ्यात शेवटी चालु करतील फक्त buses लवकर चालू होतील ..

जे कामामुळे घराकडे लक्ष देत नव्हते ते पण आता घराला स्वच्छ ठेवतील आणि बाहेर पडताना जसा मोबाईल घेतो तसा आता मास्क ही विसरायचं नाही ,कारण तोही तितकाच महत्वाचा आहे तुमच्यासाठी …

पहिली main गोष्ट आपल्याला बाहेर फिरायला भेटणार आहे मोकळेपणाने ,सगळ्या tv वरचे serials चालू होतील जेणेकरून आईचाही वेळ जाईल …

ह्या lockdown मध्ये ज्यांचे नोकऱ्या गेल्यात त्यांनी काय करायचं आहे याचा विचार केलंच असेल तर त्यांनी त्यावरच focus करा …

ज्यांनीनवीन काहीतरी शोध लावला असेल आणि आपलं career fix केलं असेल त्यांनी त्यावरच focus करा करा बाकी काही नाही ..
हे सगळं करत असताना फक्त आपल्या safety ची काळजी घ्या आणि आपापल्या कामाला लागा ..❤️

2 thoughts on “20+Corona Quotes in Marathi | कोरोना मराठी प्रेरणादायी सुविचार”

Leave a Comment