“Aai Quotes in Marathi” हा ब्लॉग special तुम्च्यसाठी घेऊन आलो आहे, कारण आपल्याला आईला खूप काही सांगायचं असतं पण समोरून काही बोलत नाही, आई साठी कितीही शब्द लिहिले तरी ते कमी पडतील कारण आईच्या प्रेमाची तुलना कुठल्याच शब्दाशी नाही करता येणार म्हणून आईसाठी घेऊन आलो आहे स्पेशल मराठी सुविचार aai quotes in marathi, आयुष्यात फक्त एकच व्यक्ति आहे जी तुमच्यासाठी झटत असते, तुमच्या आनंदासाठी धावपळ चालू असते, तुमच्या सुखासाठी मेहनत करत असते म्हणून हा Aai Quotes in Marathi ब्लॉग तुम्हाला तुमच्या आईबद्दल असलेल्या भावना व्यक्त करण्याची एक संधि देत आहे.
हे Aai Quotes in Marathi ब्लॉग वाचून तुमच्या चेहर्यावर एक आनंद येईल, हे सगळे सुविचार वाचा आणि share करा whatsapp ,instagram , facebook वर.
Aai Quotes in marathi
१. “आई
आ -आपलं आयुष्य झिजवते
ई – इतरांसाठी”
२. “आई मातृ दिन आहे ,तुझी खूप आठवण आली ,
सगळे आपापल्या आईसोबत photo टाकत होते मला तस करायचं होतं,
म्हणून मी आज आपले जुने photo बघत होतो खूप रडायला आलं ग ,
मला माहित आहे मला strong होईच आहे पण तू असतीस तर अजून हिंमत भेटली असती मला …”
आई मराठी सुविचार
३. “एक दिवस आई बाहेर गेली का आपण घरात पसारा करून ठेवतो ,तेव्हा प्रश्न पडतो की..? आई एवढ सगळ एकटी कस सांभाळुन घेते असेल ना..”
Aai Marathi Quotes
४. “मी:- आई किती काळजी घेतेस ग माझी एवढी नको
ग घेत जाऊस मी मोठा झालो आहे आता..
आई:- तू कितीही ही मोठा झालास ना तरी माझ्यासाठी
लहानच राहशील आणि जेव्हा स्वतःहा बाप होशील
ना तेव्हा समजेल तुला हे सगळं..”
५. “लहानपणी आईकडे 1 रुपया मागून खाऊ आणण्यात
जी मजा येची ती आता 100 च्या
नोटी मध्ये पण नाही नाही..❤️😊”
Aai Motivational Quotes Marathi
६. “आपली आई थोड्या वेळ आपला मुलगा डोळयांसमोर
दिसला नाही तरी घाबरते इथे तर 42 जवान
शाहिद झाले त्यांच्या घरच्यांबद्दल विचार
करूनच डोळ्यातून टचकन पाणी येत..”
हे पण वाचा⇓⇓
आईसाठी मराठी लेख
या एका शब्दातच अखंड जग सामावलेलं आहे पण एक गोष्ट नक्की आहे त्यांच्या एवढं प्रेम कोणी नाही करू शकत
कधी आईकडे जाऊन तिला एक घट्ट मिठी मारा आणि सांगा की तू किती करतेस ग अमच्यासाठी पण आम्ही नेहमी नेहमी तुलाच बोलत असतो .
तुम्हाला माहीत नसेल पण तिला किती tension असतात आपला नवरा- मुलगा घरातून बाहेर पडला की तो घरी सुखरूप येईल याचा .
आपल्या नवराच्या पगारातच सगळ्या गोष्टींची adjustment कसं करायचं हे तिलाच जमतं .
कधी झालाय का अस की आई घरात आहे आणि तुम्हाला जेवण नाही भेटलं नाही असं कधीच नाही होणार.
कधी बोलोलो आपण मला भूक नाही ग आई तरी पण ती जेवणच ताट भरून आणेल आणि जेवायला सांगेल.
लहपनी आई जाम मारायची काही चूक केल्यावर किंवा मस्ती केल्यावर कारण तिला आपली काळजी असायची .
मला तर वाटतंय तेव्हा जर मला मार नसता भेटला तर आज मी वाया गेलो असतो .
जेव्हा कधी आपण आई-बाबांन बरोबर जत्रेत जायचो तेव्हा मला हे पाहिजे ,ते पाहिजे असं मागत रडत बसायचो
कारण तेव्हा आपल्याल काही कळत नसतं तेव्हा ते आपल्याला नाही घेऊन देयचे कारन तेवढे पैसे नसायचे त्यांच्याकडे आज मग आपण फुगून बसायचो त्यांच्यावर .
तेव्हा ते सांगायचे की तूझ्या birthday ला ती वस्तू तुला gift मध्ये देऊ तेव्हा कुठे आपण शांत बसायचो .
तेव्ह जर सगळ्या गोष्टी आरामात मिळत गेल्या असत्या तर आज मला त्या पैश्याची किंमत कळली नसती .
तु खूप Great आहेस आई तुझ्याशिवाय माझ आयुष्य म्हणजे पाण्याशिवाय माश्याच आयुष्य..
aai marathi quotes
तीच routine तर खरं रात्रीच चालू होतं की उद्याला डब्याला काय बनवायचं आणि alaram लावून झोपायच त्यात पण तिला खूप झोप कुठे येते लगेच काहींना काही तरी Tension असतच.
मग सकाळी लवकर उठायचं आणि जे काही आहे ते बनवायचं डब्याला आणि कधी थोडं उशीर झाला का मग आपणच घाई करतो तिच्यामागे तरी ती कसंबसं सगळं handle करते .
बाबा आणि मी घरातून गेल्यावर मग कपडे ,भांडी काहींना काही तरी चालूच असतच पण सकाळी आई कधी अराम करत नाही .
मग दुपारी थोडं काही झोपते आणि मग लगेच काही साफ सफाई चालूच असते .
यार आई म्हणजे सगळ्या great असतात ना ,कारण आपण एक दिवस जरी घरातील काम केलं ना तरी दुसऱ्या दिवशी तुम्हीच आईला जाऊन हाथ जोडाल की आई कसं ग सगळं handle करतेस .
आम्ही घरी आल्यावर वर काय पाहिजे खायला वेगरे वगैरे सगळं झालं का 7 :00 वास्त आईचे मराठी ,hindi serials चालू असतात आणि तोच थोड्या वेळ आराम भेटतो ,
आणि जर कधी match असली आणि आईची serial चालू असली तर serial संपल्याशिवाय change पण नाही होणार उलट शिव्या जास्त पडतील ..
मग लगेच रात्रीच जेवणाची तयारी असते आणि जेवण झालं का भांडी वेगरे सगळं असतच यार एवढ्या सगळ्या गोष्टी ऐकूनच कंटाळा येतो मग तर तिला सगळं करून बाकीच्या गोष्टी पण बघायच्या असतात ,salute आहे ग तुला …
Aai relationship quotes
तुझ्याबद्दल काय बोलायचं कारण सगळ्या गोष्टी छोट्या वाटतात तुझ्यासमोर ,
चला आज थोडे मागे जाऊ, जेव्हा मी लहान होतो किती काळजी करायचीस ना तू ,
मला नेहेमी काय होऊ नये म्हणून मला नेहमी ओरडत असायची की इकडे नको जाऊ तिकडे नको जाऊ ,
मी जेवत नासायचो तेव्हा मला जबरदस्तीने भरावयचीस कारण तुला माहीत होतं मला किती भूक आहे किंवा नाही ,
तुझ्या मऊ हातांनी माझी मॉलिश करायचीस तेव्हा जाम भारी वाटायचं म्हणून मी रडायचो नाही ,
कधी तू नाही दिसलीस की रडत बसायचो कारण तुला डोळयांसमोरन लांब कधी बघितलच नाही ,
आता मोठा झालो आहे पण तुला बघितल्या शिवाय आजपण दिवस जातच नाही ,
तु कधी दिसली नाहीस की खूप चुकल्या चुकल्या सारख वाटतं ग ,
आई खूप महत्त्वाचा भाग असते आपल्या life च तिच्याशिवाय आयुष्याचा विचार करणं म्हणजे माश्याच पाण्याशीवय आयुष्य.😍
Miss u aai quotes in marathi
७. “आई म्हणजे एक झाड असतं आणि बाप
म्हणजे त्या झाडाचं मूळ असतं
जे त्या दोघांना जोडून ठेवत.”
८. “ती आईच असते,जी जेवायचं नसेल तरी आग्रह करून करून जेवायला घालते ,कधी उशीर झाल का 100 phone लावते का वेळ झालं विचारायला ,आजारी असलो का आपल्या जवळच बसून राहते सगळं काम बाजूला ठेऊन,जी कितीही ओरडली तर शेवटी परत जवळ घेऊन तिच्या मऊ हातानी गोंजारते ,खरच आई great असते मग ती कोणाची पण असुदे .✌️”
९. “आईच प्रेम म्हणजे आपण कितीही मोठे झालोना तरी
रस्ता cross करताना ती नेहमी आपला हाथ
पकडून रस्ता cross करते ,
शेवटी तिच्यासाठी आपण नेहमी लहानच राहू ..”
Loveuaai
१०.”आई -वडील आयुष्यभर फक्त आपल्या मुलांच्या आवडी निवडी
बघत आले आता वेळ तुमची आहे ,त्यांना काय आवडतं
त्यांना कशायत आंनद मिळतो ते विचारा त्यांच्यासोबत
मस्त कुठंतरी लांब trip वर जा ,
मजा करा हेच क्षण असतात जे कायम लक्षात राहतात ..”
११. “तुम्ही खूप मोठे व्हा ,पैसे कमवा ,नाव कमवा पण
एवढे मोठे होऊ नका की स्वतःच्या आई – वडिलांना उलट
बोलायला लागाल कारण आयुष्यात कितीही श्रीमंत झालात
तरी आई – वडिलांच्या चेऱ्यावरच आंनद विकत नाही घेता येत ..”
आईची आठवण स्टेटस
१२. “तुम्ही रात्री जाग राहून ,रडून कोणाला काही फरक पडणार नाही आहे ,
त्याने फक्त तुम्हाला आणि तुमच्यामुळे
तुमच्या आई -वडिलांना त्रास होणार आहे हे लक्षात घ्या ..”
१३. “आई म्हणजे अंधारात प्रकाश देणारा दिवा
वडील म्हणजे कुठल्याही परिस्तिथीमध्ये आपली सुरक्षा करणारी ढाल.”
१४. “घरात आई असते म्हणून त्या घराला घरपण असतं ,
आणि घरात बाबा असतात म्हणून त्या घराचा
पाया भक्कम असतो हे नेहमी लक्षात ठेवा …”
१५. “आई आणि बाबा यांच्यात एवढाच फरक असतो की
आई आपल्या भावना रडून व्यक्त तरी करते पण बाबा कधीच
आपल्या भावना व्यक्त करत नाही अस नाही की त्यांना
भावना नाहीत पण त्यांच्या तेवढी
सहनशक्ती असते situation handle करण्याची ….”
१६. “आईने चार गोष्ट शिकवल्या म्हणून कस वागायचं त्व कळलं ,
बाबांनी खांद्यावर घेऊन फिरवल म्हणून आज चार लोक मला ओळखता
चूक झाल्यावर 2 फटके दिले म्हणून आता त्या चुका न व्हाव्यात परत म्हणून काळजी घेतो आपण ,
बाबांनी प्रत्येक हट्ट नाही पुरवला म्हणून आज पैश्याची किंमत कळली ..”
१७. “आई-बाबा अशे दोनच व्यक्ती आहेत जे सुरवातीपासून ते
शेवटपर्यंत फक्त आपल्या मुलांचच विचार करत असतात …”
आई शायरी मराठी
१८. “आई-बाबा तुमच्याशिवाय माझं आयुष्य एकदम शून्य आहे ,
कारण उंच उंच झाड पण त्या जमिनीच्या
support शिवाय काहीच नाही .”
१९. “आई-वडिलांचं प्रेम हा चहाचा गाळणी सारख असतं
ते जगातील सर्व चटके,संकट ,दुःख गाळून आपल्याला
एक चांगलं आयुष्य देण्याचं नेहमी प्रयत्न करत असतात ..❣️”
२०. “आई-बाबा असतात म्हणून त्या घराला शोभा असते
कारण जर जर देव्हार्यात देव नसले तर
त्या सुंदर देवाहऱ्याचा काय उपयोग ..”
२१.”आई -वडिलांना पण थोडा वेळ देत जा रे दिवसातना ,
आपण आपल्या life मध्ये आणि mobile मध्ये एवढे busy
होऊन जातो की त्यांच्याकडे दुसरलक्ष होऊ जात ,
ते पण वयाने मोठे होत चाललेत आणि काही गोष्टी विसरतात
ते नाही होत काम अधिसरखी म्हणून तुम्ही
आता उलट जास्त लक्ष द्या त्यांच्याकडे ..❣️”
२२. “आई वडिलांनी
तुमच्यासाठी खूप केलंय रे ,तुम्ही त्यांचे गर्व आहात ,
तुम्ही सगळ्या गोष्टी करा life मध्ये पण कधी
काही अस काम त्याचं गर्व मोडेल आणि
मन खाली घालावी लागेल.”
कधी स्वतःसाठी काही करतच नाही ना ,कधी स्वतःची life enjoy करतच नाही ,सगळं काही फक्त आपल्या मुलांसाठी करत असतात ,
हे अशे दोन व्यक्ती आहेत जे नेहमी आपल्या सोबत असतात जरी आपण कितीही वाईट वागलो ,चुका केल्या तरीही सगळं पदरात घालतात ,
त्यांचे विचार आपल्या विचारांशी जुळत नसले ना तरी नेहमी अपल्या भल्यासाठी विचार करत असतात .
आपण किती भाग्यवान आहोत आपल्याकडे आई-वडील आहेत ,ज्यांना ते सोडून गेले आहेत त्यांच्या पण विचार करा कधीतरी
त्यांचं आयुष्य ते कसं जगत असतील आई-वडिलांशीवाय..
का माहीत नाही काहीजण त्यानां आश्रमात टाकतात ?
का रे एवढा त्रास होतो तुम्हाला तुमच्या आई-वडिलांचा ,तुम्हाला लहानच मोठं हे दिवस दाखवण्यासाठी केलं आहे का..
काय फायदा तुम्ही करोडपती होआल एकदिवस पण जेव्हा लक्ष्मी घराच्या बाहेर असते ना तेव्हा तो पैसा पण जास्त वेळ टिकत नाही …
म्हणजे तुमच्या डोक्यात हा विचार तरी कसा येऊ शकतो रे आई-वडिलांना आश्रमात टाकायचा ,तुमची एवढी सेवा केली त्यांनी, म्हातारपणी थोडा तुम्ही केलीत तर काय आहे एवढं त्यात आणि तुमचेच आईवडील आहेत ना ते…
आणि तुम्हाला वाटत असेल की अस करून आपण मोकळे झालो तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा वेळ सर्वांची येते आज ते म्हातारे झाले आहेत उद्या तुम्ही व्हाल..
आई स्टेटस मराठी
२३. “आई-बाबा आपण त्यांच्यासाठी कितीही केलं तरी त्यांनी आपल्यासाठी
जे काही केलंय त्याची परत फेड आपण नाही
करू शकत कारण त्यांचं प्रेम वेगळंच असतं.”
२४. “तुमच्या आई-वडिलांनी खूप केलय रे
तुमच्यासाठी म्हणून कधी त्यांना दुखवू नका..”
२५. “आई -बाबा तुम्ही खूप कष्ट केले आहेत आमच्यासाठी अजून
थोडे दिवस मग तुम्हाला फक्त आराम आणि
आपली Life Enjoy करायचं एवढंच काम असेल ..❤️”
२६,. “आपल्या आई-वडिलांशी गोष्टी share करत जा
कारण जेव्हा कुठली गोष्ट त्यांना बाहेरून कळते
आपल्याबद्दल तेव्हा त्यानां त्या गोष्टच जास्त वाईट वाटतं…”
अस ही करून बघायच असतं..
आईला आराम देऊन घरातील सगळी काम करायची असतात.. बाबा कामावरून आले का जरा हाथ पायांची मॉलिश करायची असते .
कुठे बाहेर फिरायला गेल्यास Mobile ने Photo काढण्यापेक्षा डोळ्यात सगळा नजरा कैद करून घेयचा असतो.,हॉटेल मध्ये party करण्यापेक्षा सगळं मित्रांना घरी बोलावून आईच्या हातच जेवण जेवायला घालायचं असत.
सकाळी लवकर उठून मोकळ्या हवेत एक फेर फटका मारून येयचा असतो.देवाकडून आपण खूप काही मागत असतो तर कधीतरी देवला जे काही दिलय त्या बद्दल Thanks बोलायच असतं.
२७. “आपल्या आई-वडिलांशी गोष्टी share करत जा
कारण जेव्हा कुठली गोष्ट त्यांना बाहेरून
कळते आपल्याबद्दल तेव्हा त्यानां त्या गोष्टच जास्त वाईट वाटतं…”
२८. “आपल्या आई-वडीलांची काळजी घ्या..
कारण जसे तुम्ही मोठे होत चाल्लात ते
पण वयस्कर होत चाल्लेत..”
२९. “आपल्या आई-वडिलांना अपल्याकडून खूप
अपेक्षा असतात मला माहित आहे आपण त्या सगळ्याच
पूर्ण नाही करू शकत पण त्यांना नाराज नका करू कधी..”
३०. “काम असल्यावर सगळेच phone करतात रे ,
पण काही खाल्लंस का ? पैसे आहेत का ?
बरा आहेस ना नीट पोहोचलास ना ?
हे फक्त आई-बाबाच विचारतात ..❤️”
Miss u aai Status in marathi
३१. “आई बाबा फक्त तुम्हला तुमचं शिक्षण देण्या इतपत
मर्यादित असतात त्यानंतर तुम्हाला तुमचं आयुष्य सावरायच असतं.
पण त्यानंतर पण जर तुम्ही त्यांनच्यावर अवलंबून असाल
तर तुम्हाला एवढं शिकवण्याचा काही उपयोग नाही..”
३२. “आई-बाबा कधी रागाच्या भरात पटकन काही
बोलून गेलो असेल तर Sorry मला
अस नव्हतं म्हणायचं पण ते बोलून गेलो..😔❤️”
३३. “आई-बाबा ओरडले किंवा कधी जास्त जिडले का आपण
रागावून बसतो त्यांच्यावर किंवा पटकन काहीतरी बोलून जातो ,
पण ते आपल्यासाठीच बोलत असतात यार पण
तेव्हा ते समजण्याच्या mood मध्ये नसतो ,
एक गोष्ट नेहमी लक्षात की ते सगळं करतात ते
तुमच्यासाठीच तर करत असतात आणि राहतील .✌️”
हे पण वाचा नक्की ⇓⇓
१. बाबांसाठी स्पेशल मराठी सुविचार
२. भाऊ-बहिणीसाठी नवीन मराठी स्टेटस
Khup chhan