आज आपण भ्ंनर आहोत आपले दैवत विठ्ठल -राकूमाई वर आधारित मराठी सुविचार ,स्टेटस,शायरी ,अभंग आणि बरच काही ,त्यासोबत आपण pandurang quotes in marathi ,विठू माऊली तू माऊली जगाची ,mauli quotes in marathi ,विठ्ठल शायरी,कानडा राजा पंढरीचा ,Vitthal status download हे तुम्ही social media वर share आणि download करू शकता आणि पूर्ण ब्लॉग वाचून कळवा कसा वाटला ते ,धन्यवाद.
Vitthala Quotes in Marathi
१. “विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल”
२. “बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल । करावा विठ्ठल जीवभाव ॥१॥ येणें सोसें मन जालें हांवभरे । परती माघारें घेत नाहीं ॥२॥ बंधनापासुनि उकलल्या गांठी । देतां आली मिठी सावकाश ॥३॥ तुका म्हणे देह भरिला विठ्ठलें । कामक्रोधें केलें घर रीतें ॥४”
३. “|| टाळ वाजे, मृदंग वाजे,वाजे हरीची वीणा|| ||माऊली निघाले पंढरपूरा..,मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा ||”
४. “तूझा रे आधार मला। तूच रे पाठिराखा।। तूच रे माझ्या पांडुरंगा।। चूका माझ्या देवा। घे रे तुझ्या पोटी।। तुझे नाम ओठी सदा राहो।।”
५. “करूनी विठ्ठल नामाचा घोष | भक्तिभावाने जोडुनी कर | नतमस्तक होऊनी चरणी | करितो नमन एकादशीच्या दिवशी ||”
६. “हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा”
७. “ताल वाजे, मृदूंग वाजे, वाजे हरीचा वीणा !! माउली निघाले पंढरपूर, मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला !! !! जय जय राम कृष्ण हरी ”
८. “डोळे मिटता सामोरे, पंढरपूर हे साक्षात | मन तृप्तीत भिजून, पाही संतांचे मंदिर || पहिली पायरी नामदेव, दुसरी असे कुंभार | एकनाथ झाले द्वार, संगे उभे तुकाराम || जना- मुक्ताई- बहिणा झाल्या तुळशीच्या माळा | वर कळस झळाळे, सोनियाचा होऊनी ज्ञानदेवा || मंदिरी उभा विठू, करकटावरी | डोळ्यातून वाहे आता इंद्रायणी, चंद्रभागा||”
९. “भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली, तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस का लागली जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हा लेकरांची विठू माउली.“
१०. “!!…जय हरी विठ्ठल….!! विठ्ठलाची ओढ किती गोड गोड जोडूनिया कर फुले मन तोच भासे दाता तोची मातापिता विसर जगाचा सर्वकाळ …. विठ्ठल विठ्ठल गजर नामाचा हारे चिंता व्यथा क्षणार्धात …. सोड अहंकार, सोड तु संसार क्षेम दे विठ्ठला डोळे मिटून …”
११. “धन्य माझी भक्ति धन्य माझा भाव, ह्रदयी पंढरिराव राहतसे…”
१२. “हित ते करावे देवाचे चिंतन, करूनिया मन शुद्ध भावे…”
१३. “आवडे हे रूप गोजिरे सगुण,पाहतां लोचन सुखावले…”
१४. “इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची…”
१५. “ऐसी चंद्रभागा, ऐसा भीमातीर,ऐसा विटेवर देव कोठे.”
१६. “कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी.”
विठ्ठल शायरी मराठी
१७. “एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम,आणि काचे काम नाही येथे…”
१८. “किती तुझी वाट पाहू रे विठ्ठला,कंठ हा सोकला आळविता…”
१९. “गुणा आला ईटेवरी, पीतांबरधारी सुंदर तो,डोळे कानन त्याच्या ठायीं, मन पायीं राहो हें…”
२०. “गुरू माता गुरू पिता, गुरू आमुची कुळदेवता,थोर पडतां साकडे, गुरू रक्षी मागें पुढे…”
२१. “जाऊ देवांचिया गावां, देव देईल विसांवा…”
२२. “ज्या सुखाकारणे देव वेडावला,वैकुंठ सोडूनी संतसदनी राहिला…”
२३. “लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा…”
२४. “विठ्ठल आवडी प्रेमभावो, विठ्ठल नामाचा रे टाहो…”
Vithu Mauli Whatsapp Status
२५. “रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजणी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, बहुत सुकृताची जोडी, म्हणूनी विठ्ठल आवडी, सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर – संत ज्ञानेश्वर”
२६ “विश्वी विसावला तो विठ्ठल – सदगुरू श्री वामनराव पै”
२७. “हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा – संत ज्ञानेश्वर”
२८. “पंढरीचा राजा उभा भक्तराजा, उभारूनि भुजा वाट पाहे – संत नामदेव“
२९. “अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पाडुरंग – संत चोखामेळा“
३०. “एक एक श्वास घेई दर्शनाचा ध्यास,चंदनाचा टिळा माथी नाम तुझे ओठी…”
३१. “सावळे सुंदर रूप मनोहर, राहो निरंतर ह्रदयी माझ्या आणिक काही इच्छा नाही आता, गोड तुझे नाम पाडुंरंगा – संत तुकाराम“
३२. “अवघा रंग एक झाला, रंगि रंगला श्रीरंग – संत सोयराबाई“
३३. “ताल वाजे, मुदूंग वाजे, वाजे हरिची वीणा, माऊली निघाली पंढपपुरी मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा…”
Pandurang Quotes in Marathi
३४. “सुखासाठी करिसी तळमळ, तरि तू पंढरीसी जाय एकवेळ, मग तू अवघाची सुखरूप होसी, जन्मोजन्मी दुःख विसरसी – संत नामदेव“